Maharashtra Political News  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : मनसे महायुतीसोबत जाणार? लोकसभेसाठी मनसेला २-३ जागा मिळण्याची शक्यता

Mns News : मनसेच्या नेत्यांनी काही दिवसापूर्वी राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मनसेची चर्चा सुरू असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News :

राज्यातील राजकारणात एक नवीन समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत जाण्याची शक्यता आहे. महायुतीत मनसेला 2 ते 3 जागा सोडण्याची देखील शक्यता आहे.

मनसेच्या नेत्यांनी काही दिवसापूर्वी राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मनसेची चर्चा सुरू असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेसाठी मुंबई आणि इतर ठिकाणी एक लोकसभेची जागा सोडण्यास भाजप तयार असल्याचं बोललं जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपला राज्यात 50 टक्के पेक्षा जास्त मतदान घ्यायच असल्यामुळे मनसेसोबत युती करण्याची शक्यता आहे. मनसेचे राज्यात 7 टक्के पेक्षा जास्त मतदार तसेच राज ठाकरे यांच्या सभेला होणारी गर्दी पाहता महायुती मनसेला सामावून घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. (Latest Marathi News)

मनसे दक्षिण मुंबई आणि नाशिकच्या जागेसाठी आग्रही असल्याची देखील चर्चा सुरु आहे. त्यामुळे महायुतीत मनसे सामील होणार का? मनसेला महायुतीकडून कोणत्या जागा मिळतील? विधानसभेतही हेच समीकरण दिसेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या काळात मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT