Raj Thackeray CM Eknath Shinde meeting Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : सर्वात मोठी राजकीय घडामोड, शिंदे-ठाकरेंमध्ये महत्वाची बैठक; वर्षा बंगल्यावर काय घडतंय?

Raj Thackeray CM Eknath Shinde meeting : राज्यात सध्या गाजत असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि जातीवाद या विषयावर देखील ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा करणार आहेत.

Satish Daud

मागील काही महिन्यांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण सातत्याने वाढतंय. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यातच उरण येथील यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीच्या हत्येने अख्या महाराष्ट्राला हादरवून टाकलंय. यासह राज्यातील विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवास्थानी दाखल झाले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा या शासकीय निवास्थानी दाखल झाले आहेत. या शिष्टमंडळात राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांचा समावेश आहे.

तसेच मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे, अजित अभ्यंकर, वैभव खेडेकर,अभिजित पानसे आणि इतर पदाधिकाऱ्यांचा देखील राज ठाकरे यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. यशश्री शिंदे हिच्या हत्याप्रकरणाची केस फास्टट्रॅक कोर्टात चालवावी, अशी मागणी राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याची माहिती आहे.

राज्यात सध्या गाजत असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि जातीवाद या विषयावर देखील राज ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा करणार आहेत. बैठकीला मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी भूषण गगराणी देखील बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे. दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता विविध विषयांवर देखील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

या चर्चेला राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत. राज्य प्रशासनातील मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर सिंह, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव सचिव दीपक कपूर, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर,तसेच गृह विभाग वित्त विभाग, एमएमआरडीए आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित आहेत. बैठक संपल्यानंतर राज ठाकरे माध्यमांना काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांना देणार साथ

Makeup Tips: जुने मेकअप प्रॉडक्ट्स वापरताय? होऊ शकतं इन्फेक्शन, अशी घ्या काळजी

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Live News Update: धुळ्यात मंकीपॉक्सचा सहावा रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT