Ajit Pawar saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: सांगलीनंतर पुण्यात अजित पवारांचा भाजपला दे धक्का, बड्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Pimpari Chinchwad Politics: पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. अजित पवारांनी भाजप आणि शिवेसना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. या दोन्ही पक्षाच्या माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Priya More

Summary:

  • महापालिका निवडणुकीपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी राजकीय घडामोड

  • अजित पवारांनी भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाला दिला मोठा धक्का

  • भाजप आणि शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

गोपाळ मोटघरे, पिंपरी- चिंचवड

सांगलीनंतर पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला. आचारसंहिता लागताच अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. अनेक बड्या नेत्यांनी भाजप आणि ठाकरे गटाची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पालिका निवडणुकीपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाची ताकद वाढली आहे.

सोमवारी राज्यात आचारसंहिता लागू होताच सर्वच राजकीय पक्ष सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात भाजप, शिवसेना ठाकरेगटाला पहिला धक्का दिला. जाधववाडीमधील भाजपच्या माजी नगरसेवक अश्विनी जाधव, शिवसेना ठाकरे गटाच्या महिला संघटिका रुपाली आल्हाट, शिवसेनेचे उपशहरप्रमुख नेताजी काशीद यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला.

अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सत्ता आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आचारसंहिता लागू होताच दुसऱ्यादिवशी अजित पवार यांनी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक बोलविली होती. त्यामुळे आगामी काळात पिंपरी चिंचवडमधील राजकारणात अनेक नवनवीन घडामोडी घडणार असल्याची चिन्ह सध्या दिसू लागली आहेत.

दरम्यान, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस, भाजप, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि जनसुराज्य पक्षातील ५ महत्त्वाच्या माजी नगरसेवकासह इच्छुक असणाऱ्या १५ जणांनी सोमवारी रात्री उशिरा पुण्यात अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान हे सर्वजण लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे सत्र न्यायालयाने नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल २९ जूनला देणार

Nasrapur Case : नसरापूर बलात्कार प्रकरणात आरोपी दोषी, सोमवारी कोर्ट शिक्षा सुनावणार

Marathi Serial : ४ वर्षांचा प्रवास अखेर संपणार; लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, चाहते नाराज

Lohgad Case: ‘केतन जिवंत आहे’ ऐकताच सियाचा थरकाप उडाला थरकाप; लोहगड तरूणाच्या हत्येप्रकरणी मोठा गौप्यस्फोट समोर

Qutb Minar : जगातील सर्वात उंच विटांची मिनार! कुतुब मिनारला 'कुतुब' नाव कसे मिळाले? वाचा खास कनेक्शन

SCROLL FOR NEXT