Maharashtra Political Crisis Saamtv
मुंबई/पुणे

Political Breaking News: लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन! CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचे आव्हान

Shinde Vs Thackeray In Thane and Kalyan Lok Sabha constituencies: निवडणूकांच्या दृष्टीने महाविकास आघाडीने कंबर कसली आहे...

Rashmi Puranik

Maharashtra Politics News: पुढील वर्षी होणाऱ्या २०२४च्या लोकसभा निवडणूकीचे राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. ज्यासाठी आत्तापासूनच अनेकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. राज्यात शिंदे- भाजप आणि महाविकास आघाडीची लढत पाहायला मिळणार आहे.

या निवडणूकांच्या दृष्टीने महाविकास आघाडीने कंबर कसली असून ठाण्यातील लोकसभेच्या जागेवर शिंदे- विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार असल्याची महत्वाची बातमी सध्या समोर येत आहे.(Maharashtra Politics)

ठाण्यात ठाकरें विरुद्ध शिंदे...

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यातील महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) आगामी लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याबाबत सध्याची महत्वाची बातमी समोर येत असून निवडणुकीत ठाणे, कल्याण लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी पक्ष (NCP) ठाकरे गटासाठी सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे..

शिवसेना (Shivsena) पक्षात उभी फूट पडल्यानंतर राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा मतदार संघात सध्या ठाकरे गटाचे राजन विचारे तर कल्याणमधून श्रीकां शिंदे खासदार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला बळकटी देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने ही रणनिती आखल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, दोन दिवसांपुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईत बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. यामध्ये लोकसभा मतदारसंघामधली स्थिती, उमेदवाराची चाचपणी, कोणत्या जागांवर राष्ट्रवादीने दावा करावा यांसोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पब्लिक ट्रान्सपोर्टमधला जबरदस्त चमत्कार! एकाच स्टेशनवर थांबणार मोनो, मेट्रो आणि मुंबई लोकल

Chanakya Niti: ही ५ ठिकाणं, तिथं कंजूषपणे वागा; कधीच होणार नाही पाकीट रिकामं, बँक बॅलन्स तर कडकच!

Maharashtra News Live Update: धावत्या दुचाकीनं घेतलं पेट, गाडी चालक जखमी; येवल्यातील घटना

डायबिटीजच्या रूग्णांसाठी धोक्याची घंटा! 'या' 5 वाईट सवयींमुळे वाढू शकते रक्तातील साखर

Accident News: सात जन्मांच्या शपथा काही तासांतच तुटल्या! हनिमूनसाठी उड्डाण, पण परतलाच नाही; पत्नीसमोरच पतीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT