Amol Kolhe vs Ajit pawar Saamtv
मुंबई/पुणे

Amol Kolhe News: अजित पवारांबद्दल माझ्या हृदयात खास कप्पा; अमोल कोल्हेंनी मानही राखला आणि आव्हानाला उत्तरही दिलं

Ajit Pawar Vs Amol Kolhe: शिरुर लोकसभा मतदार संघावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंमध्ये सामना रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

रोहिदास गाडगे

Amol Kolhe News:

शिरुर लोकसभा मतदार संघावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंमध्ये सामना रंगल्याचे पाहायला मिळत आहे. 'त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचे रान केलं होते, आता शिरुरमध्ये आम्ही पर्याय देणार अन् विरोधातला उमेदवार निवडून आणणार..' असे थेट आव्हान अजित पवारांनी अमोल कोल्हेंना दिले. अजित पवार यांच्या या चॅलेंजवर अमोल कोल्हेंनीही सावध प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणालेत अमोल कोल्हे?

"दादांचे वर्चस्व आहे. ते मोठे नेते आहेत. निवडून आणण्याचा प्रत्येक प्रयत्न करणार असे खासदार अमोल कोल्हे यावेळी म्हणाले. शरद पवार (Sharad Pawar) यांनी संपूर्ण भागासाठी चेहरा मोहरा बदलण्यासाठी खूप काम केले. जनताही पवारांच्या पाठिशी उभी राहील. जनता ठरवणार आहे. कोणाच्या बाजूच्या उभे राहायचे ,मूल्यांच्या तत्वांच्या बाजूने उभे राहायचे आहे. हे जनता ठरवेल... असेही ते पुढे म्हणाले

"अजित दादा (Ajit Pawar) हे मोठे नेते आहेत. कायम त्यांच्या वयाचा, नेतृत्वाचा, ज्येष्ठतेचा आणि राजकराणात दादांची जागा माझ्या काळजात वेगळी जागा आहे. खास कप्पा आहे तो कायम राहील. माझ्या परीने मी ठामपणे सांगू शकतो. नाराजी बोलली जात होती. निष्ठा राखली. हे सगळं घडून आलं नाही म्हणून टार्गेट केलं जातं का?" असा सवालही अमोल कोल्हेंनी उपस्थित केला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय म्हणाले होते अजित पवार?

पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंवर (Amol Kolhe) नाव न घेता टीका केली होती. त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचे रान केलं होते. मी बोलणार नव्हतो पण यांना आता उत्साह आला आहे. कोणाला पद यात्रा सुचते, कोणाला संघर्ष यात्रा काढायची आहे.... अशी टीका अजित पवार यांनी केली होती. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT