Rohit Pawar  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : मोठी बातमी! आमदार रोहित पवार यांना पक्षात मिळणार मोठी जबाबदारी? पडद्यामागे हालचाली सुरू

Mla Rohit Pawar News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

Satish Daud

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. आमदार रोहित पवार यांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर दिवंगत नेते आर.आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनाही नवी जबाबदारी मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

आमदार रोहित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली होती. निवडणुकीआधी त्यांनी महाराष्ट्रात संवाद यात्रा आणि संघर्ष यात्राही काढली होती. बारामतीत रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा जंगी प्रचार करून अजित पवार यांना मोठे आव्हान देखील दिले होते.

दरम्यान, शरद पवार यांच्या पाठोपाठ रोहित पवार यांनी केलेल्या जंगी प्रचारामुळे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १० पैकी ८ जागांवर उमेदवार निवडून आले. मात्र, या निकालानंतर अचानक रोहित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील संघर्ष उघडपणे दिसून आला. या घटनेनंतर आता रोहित पवार यांना महत्वाचं पद देऊन त्यांची नाराजी दूर केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

त्यांच्यासोबत रोहित पाटील यांनाही नवी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे जयंत पाटील यांच्याकडे विधानसभा निवडणूक संपेपर्यंत पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद कायम राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे रोहित पवार यांना आता कोणती नवी जबाबदारी दिली जाणार? याकडेच सर्वाचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: CJP नेते सौरव दास आणि आशुतोष रांका प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचा सवाल; तातडीच्या सुनावणीवर प्रश्नचिन्ह

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

Carpet Cleaning : घाणेरडे कार्पेट स्वच्छ करण्यासाठी एकही रुपया खर्च नको! घरच्या घरी ड्राय क्लीनिंग करण्याच्या 3 सोप्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT