Sharad Pawar  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: नवी मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का, बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत

Navi Mumbai Political Shock: नवी मुंबईमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदाराने शरद पवारांची साथ सोडली. ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. आगामी पालिका निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे.

Priya More

Summary Pointers in Marathi

  • शरद पवारांना नवी मुंबईत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

  • नवी मुंबईत भाजपकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे.

  • संदीप नाईक भाजपात जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

  • संदीप नाईक हे माजी आमदार असून बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी करायला सुरुवात झालेली आहे. शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना नवी मुंबई सुरू झाला आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेतले जात आहे. तर आता भाजपकडून माजी आमदार संदीप नाईक यांना भाजपात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबईत शरद पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

एक कुटुंब एक तिकीट या धोरणानुसार संदीप नाईक यांना विधानसभेत तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी पक्षात बंडखोरी करून शरद पवार गटाकडून बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भाजपकडून नवी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. शिवसेनेसोबत युती होण्याची शक्यता कमी आहे. याच दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप संदीप नाईक यांना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

माजी आमदार संदीप नाईक यांनी सुद्धा बेलापूर मतदारसंघात आमदार मंदा म्हात्रे यांच्याविरोधामध्ये बंडखोरी केली होती. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने गणेश नाईक यांच्या मदतीला त्यांचे पुत्र संदीप नाईक यांना भाजपात घेऊन आगामी काळामध्ये भाजपा कसं वाढवता येईल या दृष्टीने भाजपकडून प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. संदीप नाईक यांच्याकडे अनेक नगरसेवक आहेत. मात्र नगरसेवक भाजपने त्यांना घेतले असले तरी ते संदीप नाईकांचे समर्थक म्हणून मानले जातात.

संदीप नाईक यांचे समर्थक माजी नगरसेवकांना भाजपात घेऊन आधी त्यांना पक्षप्रवेश देण्यात आला. आता संदीप नाईकांना घेऊन भाजपचं बळ वाढवण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून महाविकास आघाडीतील नेत्यांना माजी नगरसेवकांना पक्षात घेतले जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेसुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत. मग भाजपकडून संदीप नाईक यांचा विचार पक्षात सुरू झाला आहे. ते संदीप नाईक यांना पक्षात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Porsche Case : पुण्यातील पोर्शे प्रकरणातील अग्रवाल कुटुंब पुन्हा चर्चेत, सील केलेलं हॉटेल पुन्हा मिळालं

Cold Cough Remedies: मुलं सर्दी-खोकल्याने आहेत हैराण? मग सिरप कशाला? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Maharashtra Live News Update: बेपत्ता चार पर्यटकापैकी दोघेजण अजूनही बेपत्ता; तिसऱ्या दिवशीही शोधमोहिम सुरू

Box Office Collection: 'कंतारा २' ची बंपर कमाई, 'सनी संस्कारी...' ला मोठा झटका; जाणून घ्या कलेक्शन

संध्या शांताराम यांनी अखेरचा श्वास कुठे घेतला? त्यांचा मृत्यू कशामुळे झाला? सावत्र मुलानं सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT