Uddhav Thackeray Saam
मुंबई/पुणे

Pune Shivsena: पुण्यात ठाकरे गटाला खिंडार, आणखी एका शिलेदाराने साथ सोडली

Maharashtra Politics: पुण्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्याने उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांची शहर संघटक पदी निवड करण्यात आली आहे.

Priya More

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग आणि शिंदे गटात इनकमिंग सुरू आहे. एकापाठोपाठ एक नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहेत. पुण्यातील ठाकरे गटाचे नेते आनंद गोयल यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांची शहर संघटक पदी निवड करण्यात आली आहे.

सुषमा अंधारे यांचे जवळचे निकटवर्तीय आनंद गोयल यांनी ठाकरे गटाची साथ सोडली. ते शिवसेना ठाकरे गटात शहर संघटक पदी होते. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. शिंदे गटात प्रवेश करताच त्यांची शहर संघटक पदी निवड करण्यात आली. शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या प्रयत्नांना यश आले. ठाकरे गटाच्या अनेक आजी आणि माजी नगरसेवकांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे.

पुण्यातील शिवसेना शिंदे गटाकडून दिलेल्या माहितीनुसार, शहरातील संघटना अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि निष्ठावान शिवसैनिक आनंद गोयल यांची पुणे शहर संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती २४ मे २०२५ रोजी शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. या पत्रात नमूद करण्यात आले आहे की ही नियुक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली आहे.

प्रमोद नाना भानगिरे यांनी विश्वास व्यक्त केला की, आनंद गोयल आपल्या कार्यातून आणि प्रचार-प्रसाराच्या माध्यमातून शिवसेनेला पुणे शहरात नवीन उंचीवर घेऊन जातील व समर्पित कार्यकर्त्यांच्या सहकार्याने संघटनेला भक्कम आधार देतील. गोयल यांना या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन आणि शुभेच्छा मिळत आहेत. ते आधीपासूनच पर्यावरण संरक्षण, धार्मिक सेवा आणि सामाजिक कार्यांमध्ये सक्रीय आहेत. आता त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ते शिवसेनेला पुण्यात अधिक प्रभावी आणि मजबूत बनवतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT