Ramdas Athawale On Devendra Fadnavis  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Cabinet Expansion : फडणवीसांनी शब्द पाळला नाही, मंत्रि‍पदावरून आठवले नाराज, शहांचे नाव घेत म्हणाले....

Ramdas Athawale On Devendra Fadnavis : मंत्रिमंडळ विस्तारात आरपीआय पक्षाला स्थान न मिळाल्यामुळे रामदास आठवले यांनी नाराजी बोलून दाखवली. फडणवीस यांनी शब्द पाळला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Priya More

Ramdas Athawale On Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारामध्ये रामदास आठवलेंच्या पक्षाला एकही मंत्रिपद मिळाले नाही. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे रामदास आठवले नाराज आहेत. आठवलेंनी आपली नाराजी बोलून दाखवली. देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला नाही, असेही आठवले म्हणाले. त्याशिवाय महायुतीमधून बाहेर पडण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले. ते नागपूरमध्ये शपथविधी सोहळ्याच्या आधी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. पण पाळले नाही. केंद्रीय नेतृत्वात अमित शाह यांच्याशी बोललो होतो. MLC आणि मंत्रिपद मिळावे ही मागणी होती. फडणवीस यांच्याशी बोला असे त्यांनी सांगितले होते. फडणवीस यांनी शब्द पाळला नाही, हे नाव जाहीर झाल्यावरून दिसतेय. माझ्यासोबत कार्यकर्ते महायुतीसाठी काम करत राहिले. फडणवीस यांनी शब्द पाळला नाही हे खरे आहे, रामदास आठवले म्हणाले.

आताच्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला संधी दिली नाही. आमचं एकही खासदार निवडून आला नसताना मोदींची संधी दिली. मला सत्तेचा मोह नाही. पण कार्यकर्त्यांना संधी नाही, त्यामुळे नाराज आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत RPI ला जागा द्यावी. उरलेल्या दोन मंत्रिपदावर आमच्या लोकांना संधी द्यावी ही अपेक्षा आहे, असे रामदास आठवले आहे.

नागपूर येथील मंत्रिमंडळ विस्तार होतोय, त्याचा आनंद आहे. आमच्या २३७ जागा निवडून आल्या आणि आघाडीला धक्का मिळाला. मविआला धक्का देण्याचा आमचा निर्धार होता. शिर्डी येथे मी निवडून येण्यास इच्छुक होतो. लोकसभेला संधी मिळाली नागी. विधानसभेला ३-४ जागा मिळतील, ही अपेक्षित होती. त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे उमेदवार आणि सिम्बॉल असावा ही अपेक्षा होती. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. आम्ही फडणवीस यांना शुभेछ्या दिल्यात.

पण MLC आणि मंत्रिमंडळात विचार करू असे वारंवार आम्हाला सांगितले. मंत्रिमंडळात आम्हाला संधी द्या असे म्हटले होते. शिंदेंच्या सरकारमध्ये अडीच वर्षात विस्तार झाला नाही. आम्ही BJP सोबत आहोत. फडणवीस यांना १० वेळा भेटलो त्यांनी आमचा विचार करणार म्हटले होते. पण पक्षाच्या कार्यकर्त्याला संधी मिळू नये ही दुःखाची बाबा आहे. पक्षात नाराजी आहे. पक्ष तुमच्यासोबत असताना डावलणं चुकीचे आहे, असेही आठवले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shatataraka Nakshatra : कुंभ राशीचे रहस्य; शततारका नक्षत्रातील लोक का असतात वेगळे? स्वभाव, काम आणि रोग जाणून घ्या

Horoscope: आयुष्यात घडतील आश्चर्यकारक गोष्टी; व्यवसायात दुप्पट प्रगती, वाढेल आदर,जाणून घ्या राशीभविष्य

Kumbha Rashi : आरोग्यात काळजी, नोकरी-व्यवसायात प्रगती, कसा असेल कुंभ राशीचा आजचा दिवस

Gautam Gaikwad Missing: सिंहगडावरील गौतमचा अपघात की घातपात? सीसीटीव्हीतील हुडीवाल्यामुळं गूढ वाढलं

Maval Farmer: 'जीव गेला तरी चालेल एक इंचही जमीन देणार नाही'; रिंग रोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT