Jogeshwari Rada Saam Tv
मुंबई/पुणे

Jogeshwari Rada: जोगेश्वरी राडा प्रकरण, ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याला अटक; विनयभंगाचा आरोप

Jogeshwari Thackeray Vs Shinde Group Rada: मातोश्री क्लब बाहेरील राड्याप्रकरणी आणि शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या एका शिवसैनिकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

Priya More

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीदरम्यान मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये मंगळवारी रात्री शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जोरदार राडा झाला होता. दोन्ही गट आमने-सामने येत जोरदार घोषणाबाजी आणि दगडफेक करण्यात आली होती. शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लबबाहेर हा राडा झाला होता. या राड्याप्रकरणी आणि शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या एका शिवसैनिकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरीतील मातोश्री क्लबबाहेर झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर ३ वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. आता याप्रकरणात ठाकरे गटाच्या एका शिवसैनिकाला अटक करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या चार महिला कार्यकर्त्यांचा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मातोश्री क्लबबाहेर राड्यादरम्यान विनयभंग केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये चार शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

या राडा आणि विनयभंग प्रकरणांमध्ये एमआयडीसी पोलिसांनी ठाकरे गटाचे शिवसैनिक विलास जाधव यांना अटक केली आहे. तर गुन्हा दाखल झालेले इतर ३ शिवसैनिक अजून फरार आहेत. एमआयडीसी पोलिस या फरार शिवसैनिकांचा शोध घेत आहेत. या राड्याप्रकरणी सध्या जोगेश्वरीमध्ये तणावाचे वातावरण आहे. सध्या पोलिसांकडून या राड्याप्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

जोगेश्वरी पूर्वेकडील मातोश्री क्लबमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला होता. पैसे वाटप रोखण्यासाठी गेलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर मातोश्री क्लबमधून घोषणाबाजी आणि दगडफेक केली. यावेळी ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर यांना देखील मारहाण झाली होती. ड्राय डे असताना मातोश्री क्लबमधील रेस्टॉरंट अँड बारमध्ये ३५० जणांचा जमाव असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता.

याप्रकरणी पहिला गुन्हा मातोश्री क्लबबाहेर मोठ्या संख्येने जमाव गोळा केल्याप्रकरणी आणि नागरिकांना नाहक त्रास दिल्याप्रकरणी दाखल करण्यात आला होता. दुसरा गुन्हा शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार मनिषा वायकरांच्या महिला कार्यकर्त्याच्या गाडीचा पाठलाग करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल करण्यात आला होता. तिसरा गुन्हा शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की आणि विनयभंग केल्याप्रकरणी दाखल करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: ऑस्ट्रेलियासमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली; अवघ्या १५० रन्समध्ये खुर्दा

Maharashtra Exit Poll : निलंगा विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

Saam Exit Poll: डोबिंवली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून रवींद्र चव्हाण मारणार बाजी? पाहा Exit Poll

कणकवलीत नितेश राणे पुन्हा मारणार बाजी? पाहा Exit Poll

Exit Poll Maharashtra : बीडमध्ये शरद पवार की अजित पवार? कोणाचा उमेदवार मारणार बाजी? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT