Prakash Ambedkar Saam Tv
मुंबई/पुणे

Prakash Ambedkar: ...तरच आरक्षणावरील हल्ला थांबवता येईल, प्रकाश आंबेडकरांचा ICU मधून जनतेला संदेश

Maharashtra Assembly Election 2024: प्रकाश आंबेडकर सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल असून आयसीयूमधून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी हॉस्पिटलमधूनच जनतेला महत्वाचा संदेश दिला आहे.

Priya More

'मी सध्या आयसीयूमध्ये आहे. अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी दोन्ही झालेले आहे. डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवले आहे. निवडणुकीला सुद्धा सुरुवात झाली आहे. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. ओबीसींसाठी सुद्धा महत्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार आहे. आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरून हल्ला आपल्याला थांबवता येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करा.', असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल असून आयसीयूमधून त्यांनी हा संदेश जनतेला दिला आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, 'दुसऱ्या बाजूस एससी, एसटी, ओबीसी आरक्षण वाचविण्याची ही अस्तित्वाची लढाई आहे. एससी, एसटी आरक्षणाच्या क्रिमीलेयरची अंमलबजावणी होणार आहे. या निवडणुकीत आपली सगळ्यांची जबाबदारी महत्वाची आहे. विधानसभेत आमदार निवडून आले, तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येतो. आपण वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरमागे उभे रहा.', असे आवाहनही आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना, उमेदवारांना आणि आरक्षणवादी जनतेला केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांची ३१ ऑक्टोबरला अचानक प्रकृती बघडली आणि त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी देखील करण्यात आली आहे. त्यांच्यावर सध्या डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली उपचार सुरू आहेत.

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दिवाळी सण असताना देखील हे सर्व नेते मंडळी राज्यभर दौरे करत प्रचार करत आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणुकिच्या रिंगणात उतरली आहे. राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये वंचितने उमेदवार दिले आहेत. विविध समाज घटकांना त्यांनी वंचितची उमेदवारी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT