Shivsena 16 Mla Disqualification Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar preparing to take a big decision  Saam Tv
मुंबई/पुणे

Shivsena 16 Mla Disqualification: १६ आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वात मोठी बातमी; राहुल नार्वेकरांनी घेतला मोठा निर्णय

Shivsena 16 Mla Disqualification Latest News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रतेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Shivsena 16 Mla Disqualification Latest News:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रतेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील ४० आमदारांना दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे.  (Latest Marathi News)

काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या ४० आमदारांसह ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्रतेसंदर्भात नोटीस पाठवली होती. या नोटीसीवर दोन आठवड्यात असे निर्देश राहुल नार्वेकर यांनी दिले होते.

दरम्यान, ठाकरे गटाच्या आमदारांनी अध्यक्षांच्या नोटीसीला वेळेवर उत्तर दिले. मात्र, शिंदे गटातील आमदारांनी विधीमंडळ कामकाज सुरु असल्याने मुदतवाढ मिळावी अशी राहुल नार्वेकर यांच्याकडे केली होती.

त्यामुळे या आमदारांना नोटीसीला उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटातील आमदारांना दोन आठवड्याची मुदत दिली आहे. नुकतीच विधानसभा अध्यक्ष, सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची यासंदर्भात आढावा बैठक पार पडली होती. या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून आता आमदारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी आणखी दोन आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.  (Tajya Marathi Batmya)

दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच निकाल दिला आहे. तसेच आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी रिजनेबल टाईमध्ये घ्यावा असे देखील सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.  (Latest Political News)

या याचिकेत विधानसभा अध्यक्षांना लवकरात लवरकर निर्णय घेण्याचे निर्देश देण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. त्यावर सुनावणी दरम्यान न्यायालयाने अध्यक्षांना नोटीस पाठवून या प्रकरणात काय कारवाई केली याचे उत्तर मागितले होते. यासाठी कोर्टाने अध्यक्षांना दोन आठवड्याची मुदत दिली होती.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT