Uddhav Thackeray vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Shinde vs Thackeray : 'मला काहीतरी सांगायचंय' शिंदेंच्या नाट्याला 50 खोक्यांनी उत्तर; थेट रंगमंचावर रंगणार सामना

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : शिवसेना शिंदे विरुद्ध ठाकरे वादाचे आणि आरोप प्रत्यारोपाचे मुद्दे आता भाषणासोबत रंगमंचावरही पाहायला मिळणार आहे.

Satish Daud

विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना राज्याच्या राजकारणात 'नाट्य'मय घडामोडी घडताना दिसून येत आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाशी संबंधित 'मला काहीतरी सांगायचंय' हे नाटक लवकरच रंगमंचावर येणार आहे. या नाटकामार्फेत शिवसेना फुटीची कथा रंगमंचावर दाखवण्यात येणार आहे. याला उत्तर म्हणून शिवसेना ठाकरे गटाने "50 खोके एकदम ओके" हे नाटक रंगमंचावर आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे शिंदे विरुद्ध ठाकरे वादाचे आणि आरोप प्रत्यारोपाचे मुद्दे आता भाषणासोबत रंगमंचावरही पाहायला मिळणार आहे.

Shinde vs Thackeray

शिवसेना फुटीनंतर ठाकरे आणि शिंदे गटात नेहमीच सातत्याने वादाच्या ठिगण्या उडत आहेत. लोकसभा निवडणुकीत दोन्ही गटाच्या नेत्यांनी एकमेंकावर चांगलंच तोंडसुख घेतलं होतं. तेव्हा मोठा वादही निर्माण झाला होता. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून गद्दारांना धडा शिकवणार, असा थेट इशारा दिला. दुसरीकडे आमचीच शिवसेना खरी असून बाळासाहेबांच्या विचारांची आहे, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरे यांना डिवचलं.

'मला काहीतरी सांगायचंय' शिंदे गटाचं नाट्य

राज्यात विधानसभा निवणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. याआधी शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाने एकमेकांना घेरण्यासाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. लवकरच शिवसेना फुटीची कथा रंगमंचावर येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित हे नाटक असून याचे नाव 'मला काहीतरी सांगायचंय', असं आहे. या नाटकात संग्राम समेळ हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या सेन्सॉर बोर्डाकडे हे नाटक आहे. दोन दिवसात याबद्दल अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘५० खोके एकदम ओके’ ठाकरे गट नाट्य

दुसरीकडे शिंदे गटाच्या नाट्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरे गटाने ‘५० खोके एकदम ओके’ या शीर्षकावरूनच नाट्य तयार करण्याचं ठरवलं आहे. "काय ते रस्ते... काय ते खड्डे... तरीपण म्हणायचं एकदम ओके" असा मजकूर असलेलं नाटकाचं पोस्टर्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दर्शना आर्ट्स या नाटकाची निर्मिती करणार असून लवकरच ते रंगमंचावर झळकणार आहे. त्यामुळे ठाकरे शिंदे गटाचा वादाचा नवा अंक आता राजकीय पडद्यावरून थेट रंगमंचावर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT