Lok Sabha Eknath Shinde Group Seat Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: लोकसभेसाठी शिंदे गटाचं ठरलं, ‘इतक्या’ जागांवर निवडणूक लढवणार; भाजपचं टेन्शन वाढणार?

Eknath Shinde Group: गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २२ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १८ जागांवर विजय मिळवला होता. आगामी लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेने १८ जागांवर उमेदवार द्यायला हवे, अशी आग्रही मागणी खासदारांकडून करण्यात आली.

Satish Daud

Lok Sabha Eknath Shinde Group Seat

लोकसभा निवडणूक २०२४ साठी आता फक्त काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. मात्र, महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. कुणाला किती जागा मिळणार? याचा पेच अद्यापही कायम आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सोमवारी (२६ फेब्रुवारी) संसदेच्या उभय सभागृहातील खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत शिवसेनेने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लढवण्यात आलेल्या २२ जागांचा आढावा घेण्यात आला.

गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २२ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १८ जागांवर विजय मिळवला होता. आगामी लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेने १८ जागांवर उमेदवार द्यायला हवे, अशी आग्रही मागणी खासदारांकडून करण्यात आली. (Latest Marathi News)

पक्षाचे खासदार असलेल्या जागा मित्र पक्षांसाठी सोडू नयेत, अशी भूमिकाही शिंदे गटाच्या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली. त्याचबरोबर जागावाटप लवकर निश्चित करावे, म्हणजे प्रचाराला सुरुवात करता येईल, असंही खासदारांनी यावेळी म्हटलं.

शिंदे गटाच्या या भूमिकेमुळे महायुतीतील जागावाटपाचा तिढा आणखीच वाढण्याची शक्यता आहे. कारण, भाजपने लोकसभा निवडणुकीत शिंदेला फक्त १३ जागाच सोडण्याची तयारी दर्शवल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरू शकतो.

दरम्यान, लोकसभा निवडणूक प्रचारात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेले निर्णय, समृद्धी महामार्ग, अटल सेतूसारख्या पायाभूत सोयीसुविधा असे मुद्देही प्रचारात मांडण्यात यावेत, यावरही एकमत झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT