Maharashtra Politics Saam Tv
मुंबई/पुणे

एकनाथ शिंदेंच्या विश्वासू शिलेदाराकडे मोठी जबाबदारी, पुण्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? राजकारणात मोठी उलथापालथ

Maharashtra Political News: राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. उपमुख्यमत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पुण्यामधून ते निवडणूक लढवणार आहेत.

Priya More

Summary -

  • एकनाथ शिंदेचे शिलेदार मंगेश चिवटे निवडणुकीच्या रिंगणात उरणार

  • मंगेश चिवटे यांची पुणे शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणी प्रमुखपदी नियुक्ती

  • एकनाथ शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान

  • शिक्षकांसाठी कॅशलेस विमा योजना लागू करण्यासाठी पुढाकार

पुणे शिक्षक मतदार संघातील आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील मतदारांची नोंदणी करणे आणि या दोन्ही विभागातून शिवसेनेचा उमेदवार जास्त मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी देणारे नियुक्तीपत्र शिवसेनेचे राज्य समन्वयक खासदार नरेश मस्के यांनी काढले आहे. यामध्ये पुणे शिक्षक मतदार नोंदणी प्रमुखपदी मंगेश चिवटे यांची तर मराठवाडा पदवीधर मतदार नोंदणी प्रमुखपदी राजेंद्र जंजाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या शुभहस्ते हे नियुक्तीपत्र मंगेश चिवटे यांना देण्यात आले. पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख यांनी गेली १ वर्षापासून तयारी सुरू केली. सोलापूर , सांगली , कोल्हापूर येथे एकनाथ स्वाभिमानी शिक्षकसेनेच्या वतीने शिक्षक मेळावे घेण्यात आले आहेत. एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब आडसूळ यांच्या माध्यमातून १ महिन्यापासून शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिक्षक मतदार नोंदणीची प्रक्रिया राबवत आहेत.

नुकताच सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी आम्ही आग्रही मागणी करू असे विधान केले होते. उद्योगमंत्री उदयजी सामंत, सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी देखील यापूर्वी आपल्या जाहीर भाषणातून मंगेश चिवटे शिवसेनेकडून पुणे शिक्षक मतदारसंघातून योग्य उमेदवार आहेत त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपने घ्यावा आणि पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला सोडावा असे आवाहन केले होते.

मंगेश चिवटे यांनी शिक्षकांच्या आरोग्य विषयक जिव्हाळाच्या प्रश्नाला हात घातला आहे. चिवटे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश अबीटकर यांच्याकडे पाठपुरावा करून नुकताच मंत्रालयात बैठक घेऊन राज्यातील सर्व शिक्षकांना धर्मवीर आनंद दिघे शिक्षक कुटुंब कॅशलेस विमा योजना लागू करावी म्हणून पुढाकार घेतला. यासंदर्भात आरोग्यमंत्री अबीटकर यांनी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्न आणि उपचाराची बिले काढण्यासाठी शिक्षकांना प्रचंड मानसिक त्रास होतो. यामुळे या निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्व शिक्षकांना कॅशलेस विमा योजना लागू करणार असे सांगत मंगेश चिवटे पुणे शिक्षक विभागातून आपला उमेदवारीचा प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिक शहरातील गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पोलिस ऍक्शन मोडवर

Pune Tourism : दिवाळीत करा पुणे ट्रिप, संध्याकाळी 'या' ठिकाणी मारा निवांत फेरफटका

Ashish Shelar: मंत्री आशिष शेलारांच्या जनता दरबारात मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं, पाहा व्हिडिओ

Samruddhi Kelkar: वेस्टर्न आउटफिटमध्ये समृद्धीचा ग्लॅमरस अंदाज

Sunday Horoscope: ‘या’ राशी चारचौघात कमावणार कौतुक, तर कोणाला लाभेल प्रेमळ सहवास; जाणून घ्या रविवारचे खास राशीभविष्य

SCROLL FOR NEXT