Ajit Pawar Slams Mahesh Landge Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: महायुतीत 'क्रेडिट वॉर'; भाजप आमदार लांडगेंना अजित पवारांनी CM फडणवीसांसमोरच सुनावलं

Ajit Pawar Slams Mahesh Landge: अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यात वाद झाला. पिंपरी-चिंचवडच्या विकासावरून अजित पवार यांनी लांडगे यांना सुनावलंय.

Bharat Jadhav

महायुतीत काही आलबेल असल्याचं दिसत नाहीये. मंत्रिपद आणि पालकमंत्रिपदानंतर आता क्रेडिट वॉर सुरू झालाय. याच क्षेयवादावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांना सुनावलंय. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या समोरच अजित पवारांनी आमदाराला झापल्यानं स्थानिक राजकीय वर्तुळात वादाची चर्चा सुरू झालीय.

काम करणाऱ्यांना श्रेय द्या. कंजूसपणा करू नका, असं म्हणत अजित पवार यांनी आमदार महेश लांडगेंना मुख्यमंत्र्यासमोर सुनावले. हा सर्व प्रकार घडला पोलीस आयुक्तालयाच्या उद्धघाटन कार्यक्रमात. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. मात्र यावेळी भाजप आमदार आणि राष्ट्रवादीमध्ये क्रेडिट वॉर सुरू झालाय.

त्याच झालं असं, पिंपरी-चिंचवडच्या विकासावरून आणि पोलीस आयुक्तलयावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यात श्रेयवाद सुरू झालाय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा वाद शिगेला पोहोचला.

कशावरून रंगला श्रेयवाद

आमदार महेश लांडगे यांनी आपल्या भाषणात ठामपणे सांगितलं, पिंपरी-चिंचवडचा खरा विकास २०१४ नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावरच झाला. महायुती सरकारच्या काळात पिंपरी-चिंचवडने प्रगतीपथावर झेप घेतल्याचा दावाही त्यांनी केला. य़ावेळी भाजप आमदार लांडगे यांनी शिवनेरी जिल्हा तयार करण्याची जाहीर मागणीही यावेळी केली. पुणे जिल्ह्याचे विभाजन होणार असेल, तर शिवनेरी जिल्हा करावा.

पिंपरी-चिंचवड शहराचा विकास २०१४ नंतर महायुतीच्या काळातच झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळेच पिंपरी-चिंचवड प्रगतीपथावर आल्याचं लांडगे म्हणाले. लांडगे यांच्या विधानावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. महेश लांडगेंना माझं नाव घ्यायला काय वाईट वाटलं माहिती नाही, असं म्हणत अजित पवारांनी लांडगेंवर निशाणा साधला.

पिंपरी-चिंचवडचा विकास मीसुद्धा केलाय. सन १९९२ पासून माझ्या खासदारकीपासूनच या भागातील विकासकामांची सुरुवात झाली. काम करणाऱ्यांना श्रेय द्या. कंजूसपणा करू नका. जिल्ह्यांचे विभाजन होणार, अशा बातम्यांमध्ये तथ्य नाही. जिल्हा विभाजन करणार नसल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

Maharashtra Live News Update: गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग करणारे अखेर अटकेत

Wednesday Horoscope : मेष राशीसाठी संकष्ठीला लाभ, या राशींच्या नव्या संकल्पना यशस्वी होणार

Janhvi Kapoor: नवरी नटली! जान्हवी कपूरचा नवा ब्रायडल लूक पाहिलात का?

CP Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती; 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक

SCROLL FOR NEXT