Ramdas Kadam Gajanan Kirtikar Saamtv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: 'तुमच्या गद्दारीचा इतिहास मोठा...' लोकसभा उमेदवारीवरुन रामदास कदम आणि गजानन किर्तीकरांमध्ये जुंपली

Political News: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरुन शिवसेना शिंदे गटातील दोन नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

Gangappa Pujari

Gajanan Kirtikar Vs Ramdas Kadam News:

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरुन शिवसेना शिंदे गटातील दोन नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. या मतदार संघात सध्या गजानन किर्तीकर हे खासदार आहेत. मात्र किर्तीकर त्यांच्या आजारपणामुळे निवडणुक लढणार नसल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. ज्यानंतर रामदास कदम यांनी त्यांचे चिरंजीव सिद्धेश कदम यांना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. यावरुनच गजानन किर्तीकर यांनी रामदास कदमांवर जोरदार टीका केलीय.

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघावरुन शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी गजानन किर्तीकर यांच्या मतदार संघावर दावा सांगितल्यानंतर गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी अधिकृत पत्राद्वारे रामदास कदम यांच्यावर खरमरीत टिका केलीय.

या आधीही रामदास कदम यांनी माझ्याविरोधात मालाड विधानसभा निवडणुकीत गद्दारी करत मला पाडण्याचा प्रयत्न केला होता. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कारमधून खेड ते भोर असा प्रवास करत पक्षांतरावर चर्चाही केल्याचं गजानन किर्तीकर यांनी या पत्रात म्हटलंय. यापत्रातून त्यांनी रामदास कदम यांच्या गद्दारीचा इतिहास मोठा आहे.. अशी खोचक टीकाही केली आहे.

त्यामुळे शिवसेनेतील या दोन जेष्ठ नेत्यांमधील वाद आता टोकाला गेल्याचे पाहायला मिळतयं. यावर मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (EKnath Shinde) काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, याच उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटातून गजानन किर्तीकर यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर यांची उमेदवार म्हणून नाव निश्चित झाल्याची राजकिय चर्चा आहे. त्यामुळे उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून वडिल-मुलगा अशी लढत होणार का..? अशीही राजकीय चर्चा रंगली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT