Maratha Reservation: धाराशिवमध्ये मराठा बांधव आक्रमक; मंत्री तानाजी सावंतांनी दिलेल्या साखरेची केली होळी

DharaShiv Breaking News: धाराशिवमध्ये मंत्री तानाजी सावंत यांनाही मराठा बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
Dharadhiv Breaking News:
Dharadhiv Breaking News:Saamtv
Published On

बालाजी सुरवसे, प्रतिनिधी

Maratha Reservation Protest:

राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन सर्वत्र वातावरण पेटले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरचा अंतिम दिला आहे. मनोज जरांगे यांच्या या अल्टिमेटमनंतरही गावागावात मराठा बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. धाराशिवमध्ये मंत्री तानाजी सावंत यांनाही मराठा बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरक्षणासाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) राज्यभरातील मराठा बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा बांधवांच्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय नेत्यांना चांगलीच झळ बसत आहे. धाराशिवमध्ये मंत्री तानाजी सावंत यांनाही स्वतःच्या मतदार संघात मराठा बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

सध्या दिवाळीचा सण असल्याने मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना साखर वाटप केली होती. मात्र सावरगावमधील नागरिकांककडून रस्त्यावर साखर ओतून होळी करून निषेध करण्यात आला. यावेळी साखर नको, आरक्षण द्या असे म्हणत एक मराठा, लाख मराठाच्या घोषणाही देण्यात आल्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dharadhiv Breaking News:
Maratha Aarakshan: ऐन दिवाळीत मराठा आरक्षणाचा चौथा बळी; चिठ्ठी लिहित तरुणाने संपवलं जीवन

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या...

आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक मराठा तरुण टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. ऐन दिवाळीच्या उत्सवात नांदेडमधून अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील मरळक येथील एका तरुणाने विष पिऊन आत्महत्या केलीये. आत्महत्येआधी तरुणाने राज्य सरकारच्या निषेधार्थ एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती मिळाली आहे. ऐन दिवाळीत तरुणाच्या आत्महत्येने गावात दु:खाचं वातावरण पसरलं आहे. (Latest Marathi News)

Dharadhiv Breaking News:
Ambajogai Crime: गर्दीचा फायदा घेत महिलेच्या बॅगेतील सव्वालाखाचे दागिने चोरले; अंबाजोगाई बसस्थानकातील घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com