Devendra Fadnavis Meets Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: मोठी बातमी! CM फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटं चर्चा

Devendra Fadnavis Meets Sanjay Raut: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. एका खासगी कार्यक्रमात दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीदरम्यान २० मिनिटं त्यांच्यात चर्चा झाली. भेटीचे फोटो समोर आले आहेत.

Priya More

Summary -

  • देवेंद्र फडणवीस यांनी घेतली संजय राऊतांची भेट

  • फडणवीस आणि राऊत यांच्यात २० मिनिटं चर्चा

  • खासगी कार्यक्रमात झाली दोन्ही नेत्यांची भेट

  • भेटीचे फोटो होतात व्हायरल

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली. एका खासगी कार्यक्रमात त्यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटं चर्चा झाली. या भेटीदरम्यान गप्पा मारत असतानाचा दोघांचा फोटो समोर आला आहे. या भेटीवेळी भाजपचे नेते आशिष शेलार देखील उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाचे लग्न मंगळारी रात्री पार पडले. या लग्नसोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली. या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आले होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. दोन्ही नेते हसत खेळत चर्चा करत होते. यावेळी आशिष शेलार हे देखील त्यांच्यासोबत होते.

संजय राऊत यांना गंभीर आजार झाला असून ऑक्टोबरमध्ये त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली होती. आजारावर उपचार घेण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. हे उपचार सुरू असतानाच एका महिन्यानंतर संजय राऊत यांनी नुकताच पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपचाराचा १ महिना पूर्ण झाला असून आणखी एक महिना उपचार सुरू राहणार असल्याचे सांगितले होते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काही तरी भिनसले असल्याची चर्चा सुरू आहे. दोन्ही नेत्यांमधील दुरावा वाढला आहे. अशातच आता फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीची बातमी समोर आली आणि त्यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाले आहेत. संजय राऊत हे नेहमी शिंदेसेनेवर टीका करत असतात. आता फडणवीस आणि राऊत भेटीवर त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Religious Places : भारतातील या ७ पवित्र धार्मिक स्थळांना एकदा नक्की भेट द्या

Lado Laxmi Yojana: या राज्यातील महिलांच्या खात्यावर खटाखट येणार ₹६३००; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Pune: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी समिती गठीत, शरद पवारांच्या संस्थेचं होणार ऑडिट

Maharashtra Live News Update: हिंजवडीतील शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी

Grey Hair Causes: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात? नॅचरली पद्धतीने केस काळे करण्यासाठी भन्नाट टिप्स

SCROLL FOR NEXT