Vasant More Latest News:  Saamtv
मुंबई/पुणे

VIDEO: 'मनसे, वंचित ते ठाकरेंची शिवसेना', प्रकाश आंबेडकरांची साथ का सोडली? वसंत मोरेंनी सांगितलं पुन्हा तेच कारण!

Vasant More Latest News: वंचितची साथ सोडल्यानंतर वसंत मोरे यांनी पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली. "पक्ष वाढण्यासाठी जरी काम करायला सांगितलं तर ते सुद्धा करेल," असे म्हणत वसंत मोरे यांनी आगामी विधानसभा लढवण्याबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे| पुणे, ता. ५ जुलै २०२४

पुण्याचे डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे यांनी काल वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. लोकसभेच्या तोंडावर त्यांनी मनसेची साथ सोडून वंचितमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच त्यांनी वंचितला धक्का दिला. आज पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी वंचित सोडण्यामागचे कारण स्पष्ट केले.

काय म्हणाले वसंत मोरे?

"मी पूर्वीपासूनच शिवसैनिक आहे. म्हणूनच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. नऊ जुलै रोजी कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर जाऊन मी शिवबंधन बांधणार आहे. कुठल्याही प्रलोभानासाठी शिवसेनेत न जाता उद्धव ठाकरे जी जबाबदारी देतील ती पूर्ण करेल. विधानसभा की महानगरपालिका लढवायची हे लवकरच ठरवले जाईल," असे वसंत मोरे म्हणाले.

वंचित का सोडली?

"प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला होता मात्र या गोष्टीला उशीर झाला. पक्षांतर्गत काही गोष्टी आणि कार्यकर्त्यांना संधी देणे न देणे, या गोष्टी न करता बाळासाहेबांना अपेक्षित असणाऱ्या वंचितसाठी कार्यकर्ते कामच करत नाहीत. याबाबत मी प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चाही केली होती," असे म्हणत माझ्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करुन वंचित सोडल्याचे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, "उद्धव बाळासाहेब ठाकरे हा माझा जो पूर्वाश्रमीचा पक्ष होता. त्या पक्षामध्ये जाणे मला योग्य वाटले. साहेबांनी मला कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. मात्र पक्ष संघटनेचे माझे जे जुने काम होते. तेच मी करेन. पक्ष वाढण्यासाठी जरी काम करायला सांगितलं तर ते सुद्धा करेल," असे म्हणत वसंत मोरे यांनी आगामी विधानसभा लढवण्याबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar tourism: धबधबा, हिरवळ आणि धुक्याची चादर; छत्रपती संभाजीनगरमध्ये या ५ ठिकाणी पावसाळ्यात फिरायला जा

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Bad cholesterol: महिलांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यावर ही ५ विचित्र लक्षणं दिसून येतात?

महिलांमधील 'या' 5 सवयी नवऱ्याला बिलकूल आवडत नाही

Maharashtra Politics: ठाकरेसेना अन् काँग्रेसला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह १५० पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी सोडली साथ

SCROLL FOR NEXT