Rahul NArvekar
Rahul NArvekar Saam TV
मुंबई/पुणे

Rahul Narvekar News: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ई-मेल हॅक, थेट राज्यपालांना मेसेज; कोणाची केली तक्रार?

सुरज सावंत

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ई- मेल हॅक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ई- मेल हॅक झाल्यानंतर थेट राज्यपालांना मेल केल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी राहुल नार्वेकर यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचा ई- मेल हॅक झाल्याची बातमी समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे राहुल नार्वेकर यांच्या इमेल आयडीवरून महाराष्ट्राच्या राज्यपालांना ईमेलही पाठवण्यात आला आहे.

राज्यपालांना पाठवलेल्या या ई- मेलमध्ये “काही आमदार जे सभागृहात नीट वागत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी," असा मजकूर लिहला असल्याचे सांगण्यात येत आहे. नार्वेकर यांना राज्यपाल कार्यालयाने विचारणा केली असता त्यांनी असा कोणताही ईमेल पाठवला नसल्याचे सांगितले, त्यानंतर हा प्रकार समोर आला.

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी मुंबई पोलिसात धाव घेतली आहे. याप्रकरणी राहुल नार्वेकर यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli News : सांगलीत खासदार कोण? पैज लावणं पडलं महागात!

Lok Sabha Election 2024 : "मुंबईकरांनो, आवर्जुन मतदान करा..."; सेलिब्रिटींनी चाहत्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचं केलं आवाहन

Faf Du Plessis Catch: उडता फाफ! डू प्लेसिसने हवेत उडी मारत एका हाताने घेतला भन्नाट झेल- Video

Today's Marathi News Live: कल्याणमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज

Sambhajinagar Water Crisis : हर्सूल तलावाने गाठला तळ; केवळ अडीच टक्के साठा शिल्लक

SCROLL FOR NEXT