BJP leaders gear up for Mumbai civic polls with the newly crafted ‘MY Formula’ focusing on women and youth voters. Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईसाठी भाजपचा 'MY' फॉर्म्युला, महिला, युवकांची मतं मिळवण्यासाठी रणनीती

BJP MY Formula: बिहारमध्ये दणदणीत यश मिळवल्यानंतर भाजपने मुंबई जिंकण्यासाठी रणनिती आखण्यासाठी सुरुवात केली आहे. भाजपने कुठल्या समीकरणावर लक्ष केंद्रीत केलंय ?

Girish Nikam

बिहारमध्ये एनडीएने सत्ता स्थापन केली आहे. भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्यात. या मोठ्या यशासाठी जो फॉर्म्युला भाजपनं वापरला तोच फॉर्म्युला मुंबई पालिका जिंकण्यासाठी वापरला जाणार असल्याची चर्चा आहे. जास्त मतं मिळवण्यासाठी भाजपकडून खास रणनीती आखली जातेय. अगदी वॉर्डनिहाय जबाबदारी निश्चित केली जातेय. पाहूया भाजपचा काय फॉर्म्युला असणार आहे.

बीएमसीसाठी भाजपचा 'MY' फॉर्म्युला

बिहारमधील यशानंतर भाजपचं मुंबईत 'MY' समीकरण

महिला (M) आणि युवक (Y) मतदारांची जास्तीत जास्त मतं मिळवण्याची रणनीती

युवकांची मतं मिळवण्यासाठी भाजप युवा मोर्चाकडे विशेष जबाबदारी सोपवणार

महिला मतदारांना सक्रिय करण्यासाठी भाजपची महिला विंग सक्रियपणे काम करणार

प्रत्येक वॉर्डमध्ये महिला आणि तरुण मतदारांचा आढावा घेऊन रणनीती निश्चित करणार

मुंबईकरांचा विश्वास सार्थ ठरवून भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणार असल्याचं मुंबई भाजपचे अध्यक्ष अमीत साटम यांनी म्हटलंय. 2017 मधील मुंबई मनपा निवडणुकीत भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. शिवसेना पेक्षा फक्त दोन जागा भाजपला कमी होत्या. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. पक्षाची ताकद वाढली आहे. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. तरी बेसावध न राहता MY फॉम्युर्लावर भाजपची मदार आहे. ठाकरे बंधूंसमोर ही रणनिती किती प्रभावी ठरते ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमचं WhatsAPP कुणीतरी वाचतंय? लीक झालेल्या डेटात तुमचाही नंबर? VIDEO

Maharashtra Politics : 'उदय सामंत शिंदेसेना फोडणार'; ठाकरे गटाच्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Friday Horoscope : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना अडचणीवर मात करावी लागणार

Uddhav Thackeray : साधू हत्याकांडातील आरोपीला भाजपमध्ये प्रवेश म्हणजे हिंदुत्वाचा अपमान? उद्धव ठाकरे कडाडले

कोकणात राणे बंधू आमने-सामने, भावांच्या संघर्षाला नारायण राणेंचा आशीर्वाद?

SCROLL FOR NEXT