Deputy CM Eknath Shinde saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यातच मोठा झटका, बड्या नेत्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

Deputy CM Eknath Shinde: ठाणे आणि नवी मुंबईत एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाची साथ सोडत आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

Priya More

Summary -

  • ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला

  • ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची साथ सोडली

  • उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

  • स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढली

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का दिला आहे. शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाची साथ सोडत शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. ठाणे आणि नवी मुंबईतल्या सानपाडामधील अनेक पदाधिकाऱ्यांनी मशाल हाती घेतली. त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद चांगलीच वाढली आहे.

ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाला रामराम ठोकत आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या सर्वांच्या हातामध्ये शिवबंधन बांधत त्यांचे पक्षामध्ये स्वागत केले. तसंच, निवडणुकीच्या कामाला लागावे असे आवाहन केले.

मंगळवारीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने पक्षाची साथ सोडली होती. ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख रामचंद्र पिंगुळकर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. रामचंद्र पिंगुळकर यांच्यासोबत त्यांचे सहकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील मशाल हाती घेतली होती.

उद्धव ठाकरे, राजन विचारे, किशोरी पेडणेकर आणि केदार शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला होता. त्यानंतर आज ठाण्यातील आणखी काही पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाण्यात शिंदेगटाला खिंडार पडले असल्याची चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chia Seeds: थंडीत सब्जा खा; त्वचा, वजन आणि तब्येतीसाठी उपयोगी

Maharashtra Live News Update: Evm चीप कुठे बनवले जाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारा - प्रकाश आंबेडकर

Sanchar Saathi App: एका दिवसात ६ लाख लोकांनी डाउनलोड केला 'संचार सारथी'; अ‍ॅपची खासियत आहे तरी काय?

Kalyan : भाजपचा शिंदेसेनेला पुन्हा धक्का, कल्याणमधील शिलेदार फोडला

IND vs SA: आता तरी जिंकूदे! टॉस जिंकण्यासाठी केएल राहुलने वापरला खास टोटका, तरीही पदरी निराशाच; पाहा नाण्यासोबत कर्णधाराने काय केलं?

SCROLL FOR NEXT