MAHARASHTRA POLITICS: BIG BLOW TO AIMIM AS GOVANDI CORPORATOR SHAMIR PATEL'S MEMBERSHIP IS CANCELLED Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनंतर एमआयएमला मोठा धक्का; BMCमधील नगरसेवकाचं पद रद्द, कारण काय?

AIMIM Corporator Membership Cancelled : एमआयएमचे नगरसेवक शमीर पटेल यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेअंतर्गत गोवंडी परिसरातील प्रभाग क्रमांक १३७ मध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

Bharat Jadhav

  • गोवंडीतील एमआयएमचे नगरसेवक शमीर पटेल यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले.

  • मुंबई महापालिकेतील एमआयएमला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

  • राज्यात आधीच सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये आणखी भर पडली आहे.

राज्यातील राजकारणात मोठी घडामोडी होत आहेत. ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. आता एमआयएमला मोठा धक्का बसला आहे. एमआयएमचे नगरसेवक शमीर पटेल यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेतील ऑल इंडिया मजलिस -ई -इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाला मोठा धक्का बसलाय. गोवंडी येथील प्रभाग क्रमांक 137 मधून निवडून आलेले एमआयएमचे नगरसेवक शमीर पटेल यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आलंय.

नगरसेवक पद का रद्द झालं? काय आहे कारण ?

शमीर पटेल यांनी ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवरून निवडणूक लढवली होती, तेथे त्यांना मोठा विजय मिळला होता. मात्र, त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेण्यात आल्यानंतर प्रकरण जात पडताळणी समितीकडे गेलं होतं. त्यानंतर अहमदनगर डिस्ट्रिक्ट कास्ट स्क्रूटिनी कमिटी(सध्याचे अहिल्यानगर) जिल्हा जात पडताळणी समितीने शमीर पटेल यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवले.

समितीच्या या निर्णयानंतर त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने घोषणा करत त्यांचे सदस्यत्व रद्द केलं. महापालिकेच्या निर्णयामुळे मुंबई महापालिकेतील एमआयएमचे संख्याबळ आठवरून सातवर आले आहे. आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने हा पक्षासाठी महत्त्वाचा धक्का मानला जातोय.

दरम्यान शमीर पटेल यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर महापालिकेतील राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांकडून यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान याआधी महापालिकेत नगरसेवकाचे पद रद्द करण्यात आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या एका नगरसेवकाचेही सदस्यत्व इतर कारणांमुळे रद्द करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध, तरुणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काटा काढला, आई-वडील अन् बहिणीला संपवलं

Maharashtra News Live Update: पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत

Water Cut : कल्याण-डोंबिवलीकरांवर पाणीसंकट! 'या' भागातील पाणीपुरवठा 3 दिवस राहणार बंद

पावसाळ्यात डायबिटीजचा धोका का वाढतो?

Delhi Crime: दिल्ली हादरली! १० वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, मृतदेह जंगलात नेऊन फेकला

SCROLL FOR NEXT