Aditya Thackeray: 'अशा उमेदवारांना शपथ दिली तर...' आदित्य ठाकरेंचा रविंद्र वायकरांसह, निवडणूक आयोगावर निशाणा, म्हणाले...
Aditya Thackeray News Saamtv
मुंबई/पुणे

Aditya Thackeray: 'अशा उमेदवारांना शपथ दिली तर...' आदित्य ठाकरेंचा रविंद्र वायकरांसह, निवडणूक आयोगावर निशाणा, म्हणाले...

Gangappa Pujari

संजय गडदे, मुंबई|ता. १६ जून २०२४

शिवसेना शिंदे गटाचे मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभेचे उमेदवार रविंद्र वायकर यांचा विजय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभेच्या मतमोजणीवेळी गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत असून याप्रकरणी वायकर यांच्या मेहुण्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. यावरुन बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

"उत्तर पश्चिममधील गडबड लोकांसमोर आली आहे. निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला नकार दिला आहे. म्हणजे त्यांना ती अनिल मस्कींसारखी फुटेज नको आहे. तिथली गडबड लोकांसमोर आली होती. अशा उमेदवारांना शपथ दिली तर देशात लोकशाहीचा खून झालाय, हे समजूनच काम करावे लागेल. अशा चिटर लोकांना शपथ कशी देऊ शकता? याविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत, "असे आदित्य ठाकरे म्हणाले.

तसेच "राहुल गांधी, यांनीही याबाबत ट्वीट केले आहे. एलन मस्कही बोलले आहेत. सीसीटीव्ही फुटेजही द्यायला तयार नाहीत. एवढी सगळे चिटींग करुनही लोकांनी त्यांना २४० वर खेचले. जर एव्हीएम नसते तर ४० ही पार केले नसते," असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.

"भाजपमध्ये ताळमळ नाही. कोण काय बोलतं, कोण काय बोलतं? लोकांनी त्यांना जागा दाखवली आहे. आमच्या देशात मस्ती चालत नाही हे दाखवून दिले आहे. लोकांचे प्रश्न आहेत त्यावर ते बोलत नाहीत," असे म्हणत मुंबई पालिकेच्या कारभारावरुनही आदित्य ठाकरे यांनी टीका केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi Speech: 'खोट पसरवणाऱ्यांना सत्य ऐकू येत नाही', विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर PM मोदींचा टोला!

Viral Video : रील व्हिडिओ बनवण्यासाठी डॅमवर साडी नेसून आली; पाय घसरला आणि तरुणी पाण्यात पडली, पाहा VIDEO

APMC Potato News: तुमच्या ताटात सडलेले बटाटे? 300 टन बटाटे सडले!

IND vs ZIM,Live Streaming: जियो किंवा हॉटस्टार नव्हे, तर इथे पाहता येतील भारत- झिम्बाब्वे मालिकेतील सामने LIVE

Milk Price : दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक; तासगाव तहसीलवर जनावरांसह मोर्चा, अकोले तालुक्यात शेतकऱ्यांनी केले मुंडन

SCROLL FOR NEXT