Tushar Bhosle Warn To Rohit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: शरद पवारांना विठ्ठल म्हणणं तात्काळ थांबवा; अन्यथा... तुषार भोसलेंचा इशारा

Tushar Bhosle Warn To Rohit Pawar: शरद पवार यांना विठ्ठल बोलणं तातडीने थांबवा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Tushar Bhosle Warn To Rohit Pawar: शरद पवार यांना विठ्ठल बोलणं तातडीने थांबवा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिला आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना ओढ विठ्ठलाच्या भेटीची असं म्हणत रोहित पवार यांनी शरद पवार यांचा फोटो ट्विट केला होता. या ट्वीटवरून तुषार भोसले यांनी हा इशारा दिला आहे.

राजकीय नेत्याला विठ्ठलाची उपमा देणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? असा सवाल देखील तुषार भोसले (Tushar Bhosle) यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे, असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला होता.

काय म्हणाले तुषार भोसले?

जगाचा मालक आणि महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या विठ्ठलाची उपमा एखाद्या राजकीय नेत्याला देणं शोभतं का? आता महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? असा सवाल आचार्य तुषार भोसले यांनी उपस्थित केला आहे. थोडी तरी लाज बाळगा शरद पवार यांना विठ्ठल संबोधणं तातडीने थांबवा, नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही तुषार भोसले यांनी दिला आहे.

रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं होतं?

रोहित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नाशिक दौऱ्यानिमित्त ट्विट केलं. "ओढ ‘विठ्ठला’च्या भेटीची!!! कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य नागरीक यांची आज नाशिकला भेट झाली असता आम्ही सर्वजण आमच्या विठ्ठलाच्या अर्थात मा. पवार साहेबांच्या भेटीसाठी उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं…" असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

"उद्याचा मा. पवार साहेबांचा दौरा. सकाळी ८ वाजता – मुंबईहून नाशिककडे प्रयाण.मुंबई-नाशिक मार्गाने १२ वाजता नाशिकमध्ये दुपारी १२ नंतर येवल्याकडे प्रयाण. सामान्य कार्यकर्त्यांनाही शरद पवार विठ्ठलासारखेच वाटत आहेत हेच रोहित पवार यांनी दाखवून दिलं आहे". तसंच रोहित पवार यांनीही शरद पवार यांचा उल्लेख विठ्ठल असाच केला आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT