Saam Tv
मुंबई/पुणे

Political News: मोठी बातमी! शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashta Political News: पालघरमध्ये आमदार राजेंद्र गावित यांच्या मुलाला अटक करण्यात आली. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

Priya More
  • आमदार राजेंद्र गावित यांच्या मुलाला अटक

  • रोहित गावित यांना पालघर पोलिसांकडून अटक

  • पालघर रिलीफ हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्याला झाली होती मारहाण

  • रोहित गावित यांना मीरारोड येथील क्लबमधून अटक करण्यात आली

रुपेश पाटील, पालघर

पालघरमध्ये शिवसेना शिंदेगटाच्या आमदाराच्या मुलाला पोलिसांनी अटक केली. पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमधील डॉक्टरला मारहाण प्रकरणात पोलिसांनी ही कारवाई केली. मारहाणीच्या घटनेनंतर फरार आरोपी आमदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित यांना अटक करण्यात आली. मिरा रोड येथील जीसीजी क्लबमध्ये पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

रिलीफ हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हाप्रमुख कुंदन संखे, आमदार पुत्र रोहित गावित यांच्यासह १४ आरोपी फरार झाले होते. पालघर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. अखेर रोहित गावित यांना मीरा रोड येथून पालघर पोलिसांनी अटक केली. आमदार पुत्राला अटक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमध्ये जखमी गोविंदा यांच्यावरील उपचाराच्या वादातून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी वाद झाला होता. या वादानंतर आमदार पुत्रासह या सर्वांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. या कथित मारहाण प्रकरणात फरार असलेले आमदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित यांना पालघर पोलिसांनी अटक केली. मीरा रोड येथील GCG क्लबमधून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप या सर्वांवर करण्यात आला आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले होते. रोहित गावित यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात येणार असून या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोधही पालघर पोलिसांकडून सुरू आहे. पोलिस सध्या इतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पालघर पोलिसांकडून पथक रवाना करण्यात आली आहेत. उर्वरित आरोपींचा ही लवकरात लवकर अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिल द्या, नाहीतर आत्मदहन; म्हाडा कंत्राटदारांचा संताप, अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: भारतामध्ये स्टार्टअपची क्रांती होत आहे - पीएम मोदी

Dhule News : मंत्र्यांसमोरच शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळली, उदय सामंतांनी कान टोचले

Saturday Horoscope : पैसा मिळेल, भांडणं मिटतील अन् आनंदाची बातमी मिळेल; 'या' ५ राशींना शनिवार शुभ

Mumbai Tourism : मुंबईतच आहे काशीची झलक? मुंबईच्या या भागाला म्हणतात ‘मिनी काशी’

SCROLL FOR NEXT