Sanjay Raut Criticized Devendra Fadnavis And Amit Shah Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut: अमित शहा यांच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut Criticized Devendra Fadnavis And Amit Shah: राज्यातील भाजपच्या मुख्यमंत्री पदावरून संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

Priya More

'अमित शहा यांच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही.', असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसंच, 'हे सरकार मोदींचं नसून एनडीएचेच आहे.', असा देखील टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लगावला आहे.

संजय राऊत यांनी भाजपच्या आगामी मुख्यमंत्र्याविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'राज्यात महायुतीकडे 7 मुख्यमंत्री आहेत. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचा पाय कापून कसं मुख्यमंत्री बनवता येईल असा प्रयत्न सुरू आहे. अमित शाह यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येत नाही. ते कोअर कमिटीच्या बैठकीत सांगत आहेत भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे. पण अमित शाह यांच्या मनातील मुख्यमंत्री हा देवेंद्र फडणवीस नाहीत. भावी मुख्यमंत्री (तिन्ही पक्षाचे) एकमेकांचे पाय खेचणार करणार आहेत. एकमेकांचे उमेदवार पाडणार आहेत.', असे मत राऊतांनी व्यक्त केले.

संजय राऊत आजच्या अर्थसंकल्पाविषयी प्रतिक्रिया देताना मोदी सरकारवर टीका केली. त्यांनी सांगितले की, 'हे सरकार मोदींचे नसून एनडीएचे आहे. आधीची १० वर्षे मोदी सरकार होतं अस आम्ही नाही तर ते म्हणतात. निर्मला सीतारामन यांनी काही फार मोठा चमत्कार केलाय असं नाही. आमच्या अपेक्षा खूप आहेत. आधीच्या पण अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. महागाई आणि बेरोजगारी हा देशासमोरील गंभीर प्रश्न आहे. शेतकरी, जुनी पेन्शन योजना यावर काही असेल तर आम्ही समाधानी असू.'

'आज महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. बिहार आणि आंध्र प्रदेश सरकारच्या टेकूवर देशातील सरकार उभे आहे. दोन राज्यांना स्पेशल राज्याचा दर्जा देण्याचं वचन दिलं होत पण ते सरकारने पाळलेल दिसत नाही. मुंबईची लूट आणि ओरबड केंद्र सरकारने थांबवली पाहिजे. मुंबईत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय वित्त केंद्राची निर्मिती करताना सरकार दिसलं तर आम्हाला आनंद होईल.', असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amarnath Yatra Bus Accident : अमर यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

SCROLL FOR NEXT