Devendra Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis: नववधूच्या पोस्टवर फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी; त्या पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय?

Devendra Fadnavis Apology: विराली यांनी पोस्ट शेअर करत तक्रार केली आणि संतापही व्यक्त केला.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Political News:

आपला भारत देश आधुनिकतेच्या मार्गावर चाललेला असताना अद्यापही अनेक ठिकाणी व्यवस्थित सोईसुविधा नाहीत. विविध शासकीय कार्यालयांसह विविध ठिकाणी दिव्यांग नागरिकांसाठी व्यवस्थित सुविधा नाही. याचीच प्रचिती मुंबई विवाह रजिस्ट्रार ऑफिसमध्ये आलीये. हा अनुभव एका दिव्यांग वधूने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर दिलगिरी व्यक्त केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विराली मोदी नावाच्या महिलेचा १६ ऑक्टोबर रोजी विवाह पार पडला. यावेळी त्या खार येथील रजिस्ट्रार कार्यलयात पोहचल्या होत्या. मात्र येथे त्यांची गैरसोय झाली. त्यामुळे आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर विराली यांनी पोस्ट शेअर करत तक्रार केली आणि संतापही व्यक्त केला. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील संताप व्यक्त केला. पुढे यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केलीये.

वधूची पोस्ट काय?

मी १६ऑक्टोबर रोजी खार येथील रजिस्ट्रार कार्यलयात विवाहासाठी गेले होते. त्यांचं ऑफिस दुसऱ्या मजल्यावर होतं. तेथे जाण्यासाठी लिफ्ट नव्हाती. त्यामुळे आम्ही रजिस्ट्रार कार्यलयातील व्यक्तींना खाली येण्यास विनंती केली मात्र कोणीही आमची दखल घेतली नाही. मला झालेल्या अडचणीत आणखीन दुखापत झाली असती तर? याची जबाबदारी कोणी घेतली असती, असं या महिलेने म्हटलं.

तसेच आपल्या पोस्टमध्ये विराली यांनी पुढे लिहिलं की, मी कोणती वस्तू नाही जे मला अशा पद्धतीने वागणूक दिली जातेय. माझं दिव्यांग येथील नागरिक आणि सरकार स्विकारू शकत नाही का? असा संतप्त सवालही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या याच पोस्टवर फडणवीसांनी दिलगीरी व्यक्त केलीये.

देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट

सर्व प्रथम नवीन सुरुवातीबद्दल खूप खूप अभिनंदन आणि तुम्हा दोघांना खूप आनंदी आणि सुंदर वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छ! तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल मी खरोखर दिलगीर आहे. मी वैयक्तिकरित्या दखल घेतली आहे आणि मी सुधारात्मक आणि योग्य कारवाई करीन, असं ट्वीट करत फडणवीसांनी दिलगीरी व्यक्त केलीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

Maharashtra News Live Updates: मुंबई नाशिक महामार्गावरील दोन्ही मार्गावरील वाहतूक मंदावली

Washim Bajar Samiti : आठवडाभरातच सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक; वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीतील स्थिती

Devendra Fadnavis : 'बटेंगे तो कटेंगे' हा देशाचा इतिहास, देवेंद्र फडणवीसांचं योगींच्या घोषणेला समर्थन

SCROLL FOR NEXT