शिंदे सेना आणि भाजपमध्ये केडीएमसी निवडणुकीपूर्वीच आरोप-प्रत्यारोपांची मालिका
अरविंद मोरे यांनी भाजपवर “पाठीत खंजीर” खुपसल्याचा आरोप
नरेंद्र पवार यांनी पलटवार करत शिंदे सेनेला युती तोडण्याचं आव्हान दिलं
या वादामुळे महायुतीच्या एकतेवर आणि निवडणुकीतील समीकरणांवर प्रश्नचिन्ह
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजल्यानंतर आता महानगर पालिकेच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच या निवडणुकांपूर्वी महायुतीत फिस्कटलेल पाहायला मिळत आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सिंधुदुर्गात दीपक केसरकर यांनी नितेश राणेंसोबत युती होणार नसल्याचं म्हटलं. तर दुसरीकडे केडीएमसी निवडणुकीपूर्वीच युतीत वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपवर केलेल्या आरोपांना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी थेट सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा केल्यानंतर आता वेध लागले आहेत ते महानगरपालिकेच्या निवडणुकांचे. मात्र या निवडणुकांआधी केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शिंदे गट आणि भाजपमध्ये थेट आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपवर केलेल्या आरोपांना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी थेट सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
अरविंद मोरे यांनी भाजपवर युतीत असतानाही पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता. यावर प्रतिक्रिया देताना नरेंद्र पवार म्हणाले, "शिवसेना नेहमी युती करूनही मागून वार करते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी कपिल पाटील यांच्या विरोधातच बूथ लावले. आम्ही मात्र युतीच्या बाजूने होतो. ते पुढे म्हणाले, त्यांना जर युती नको असेल, तर त्यांनी स्पष्ट सांगावे. आम्ही तयार आहोत त्यांनी युती तोडावी, मग त्यांना भाजपची ताकद समजेल."
केडीएमसी निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या वक्तव्यांमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.राजकीय वातावरण तापले आहे दोन्ही पक्षांतली वाढती दरी लक्षात घेता, आगामी निवडणुकीत शिंदे सेना आणि भाजप एकत्र लढणार का, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.