Navi Mumbai Mahadev Pawar Seatback News Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना धक्का, बड्या नेत्यासह ४० कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai Mahadev Pawar Seatback News : नवी मुंबईत शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार, जिल्हा महिला उपाध्यक्षा सुषमा पवारांसह ४० हून अधिक राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत भगवा हाती घेत प्रवेश केला आहे.

Alisha Khedekar

  • महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत मोठी पक्षांतर घडामोड

  • शरद पवार गटाला खिंडार

  • महादेव पवारांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश

  • महिला नेत्या व वॉर्ड अध्यक्षांसह 40+ कार्यकर्त्यांचा सामूहिक प्रवेश

विकास मिरगणे, नवी मुंबई

राज्यात महापालिका सार्वत्रिक निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी पक्षपक्षातील फोडाफोडी सुरूच आहे. नवी मुंबई शहरामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला खिंडार पडले असून माजी जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. किशोर पाटकर यांनी शिवसेनेचा स्कॉर्फ महादेव पवार यांच्या गळ्यात टाकत, हाती भगवा देत त्यांचा शिवसेना प्रवेश केला.

यावेळी महादेव पवार यांच्या समर्थकांनी व राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमास शिवसेना माजी नगरसेवक रतन मांडवे, काशिनाथ पवार उपस्थित होते. यावेळी पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे माजी वॉर्ड अध्यक्ष यशवंत मोहिते, प्रमोद शेळके, रविंद्र सुर्वे, राजेंद्र कोरडे, रोहिदास हाडवळे, रोहन वाघ, सोमनाथ शिंदे, राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला उपाध्यक्षा सुषमा महादेव पवार, सुजाता घारे, सविता हाडवळे, संगीता सावंत, सविता यादव, राजश्री पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

महादेव पवार हे नेरूळ पश्चिममधील जनधार असलेले स्थानिक नेतृत्व असून त्यांचा सारसोळे, सेक्टर सहा परिसरात घरटी जनसंपर्क असून सेक्टर आठ, दहा. कुकशेत गाव, सोळा या ठिकाणीही महादेव पवार परिचित असून त्यांच्या प्रवेशामुळे नेरूळ पश्चिम परिसरात शिवसेनेला बळकटी आल्याचे मानले जात आहे. तसेच 40 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी शरद पवार गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात महाविकास आघाडीचा जागावाटप तिढा सुटला?

Sanjay Raut : शरद पवारांचा पक्ष फोडण्यात अदानींच्या भावाचा हात, राऊतांच्या दाव्याने देशात खळबळ

Eyelash Care: भुवयांचा रंग फिकट दिवसेंदिवस फिकट दिसतोय? या सोप्या टीप्सने भुवया दिसतील एकदम ठळक

Solapur : भावी नगरसेवकाची निर्घृण हत्या, उशीनं तोंड दाबून उमेदवाराला संपवलं, ५० तोळं सोनं गायब

Upcoming Bollywood Movies : 'किंग' ते 'रामायण'; 2026 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार 'हे' 8 चित्रपट

SCROLL FOR NEXT