Maharashtra Political Crisis News Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

सहकार्याबद्दल धन्यवाद! मंत्रिमंडळ बैठकीत CM उद्धव ठाकरेंनी मानले सर्वांचे आभार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच आपल्या सहकाऱ्यांशी बोलतना मला सहकार्य दिल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : तुम्ही जे सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद, जी कायदेशीर प्रक्रिया असेल त्याला सामोरे जाऊ, मला माझ्याच लोकांनी धोका दिला म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मंत्रीमंडळाच्या बैठकीदरम्यान आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना केलं आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांनी राज्यसरकारला उद्या बहुमत चाचणी घेण्याबाबतचे आदेश दिले आहेत. या चाचणी विरोधात शिवसेनेने (Shivsena) दाखल केलेल्या याचिकेवर सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरु आहे. त्यामुळे जर कोर्ट निर्णयामध्ये जर राज्य सरकारला उद्याचं आपलं बहुमत सिद्ध करावं लागलं तर काय होणार, सरकार टिकणार की कोसळणार? याबाबत सध्या सर्वांच्या मनात शंका उपस्थित होत आहेत.

पाहा व्हिडीओ -

अशातच आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच आपल्या सहकाऱ्यांशी बोलतना मला सहकार्य दिल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी धन्यावादाची भाषा का केली याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

दरम्यान, आजची मंत्रिमंडळच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले, 'राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना अशा वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले. चांगले काम केले. सगळ्यांनी उत्तम प्रकारे सहकार्य केलं त्या सर्वांचे आभार मानले.

तुमच्या दोन्ही पक्षांचे चांगले सहकार्य मिळाले. आमच्या पक्षातील काहींनी दगा दिला. आमच्याच पक्षातील लोकांनी साथ दिली नाही, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली असं पाटील यांनी सांगितलं. शिवाय विश्वासदर्शक ठराव उद्या मांडला जाणार आहे, त्याआधीच त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरू आहे. सुप्रीम कोर्टात निर्णय होईल, त्याप्रमाणे आम्हाला काम करावे लागेल असं पाटील म्हणाले.

दरम्यान, या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या "संभाजीनगर" नामकरणास मान्यता दिली. तर उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव" नामकरणास मान्यताही दिली आहे त्यामुळे सरकार ही आज गडबड का करत आहे त्यांना उद्या बहुमत सिद्ध करता येणार नाही का? असा प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, उर्जामंत्री नितीन राऊत, अस्लम शेख, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,अशोक चव्हाण, विश्वजित कदम, अमित देशमुख, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT