Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांना केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा

एकनाथ शिंदे यांना केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गोवा येथे थांबलेल्या आमदारांसोबत बैठक घेतली आहे. बैठक पार पडल्यानंतर ते आता मुंबईसाठी रवाना झाल्याची माहिती आहे. अशातच एकनाथ शिंदे यांना केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे हे मुंबईत दाखल झाल्यानंतर राज्यपालांची भेट घेणार आहे. त्यामुळे आता त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. (Eknath Shinde News)

उद्याच शपथविधी होणार?

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. त्यानंतर आता राज्यातील राजकीय घडामोडींना आणि राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. दुसरीकडे, आजच भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे उद्याच शपथ घेतील, अशी शक्यता आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली.

एकनाथ शिंदे-फडणवीस भेट

एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. ते थोड्याच वेळात मुंबईत पोहोचतील. मुंबईत आल्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील. तशी माहिती शिंदे यांनी स्वतःच गोव्यातील विमानतळावर माध्यमांशी बोलताना दिली आहे. सागर या निवासस्थानी फडणवीस आणि शिंदे यांची भेट होणार आहे. या भेटीनंतर साधारण साडेतीन वाजता फडणवीस आणि शिंदे हे राजभवन येथे जातील. तसेच सरकार स्थापनेचा दावा करतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

"तोपर्यंत सरकारचा शपथविधी होऊ शकत नाही"

दरम्यान, या नव्या सरकारला ११ तारखेपर्यंत शपथविधी घेता येणार नाही, असा दावा विजय वड्डेटीवार यांनी केला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, बंडखोर केलेल्या १६ आमदारांना उपसभापतींनी दिलेली नोटीस जीवंत आहे. या नोटीसीला त्यांना ११ जुलैपर्यंत खुलासा द्यावाच लागणार आहे, तोपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी होणार नाही, असे माझे मत आहे. असं कॉंग्रेस नेते विजय यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rinku Rajguru: नास्तिकतेपासून अध्यात्माकडे...; 'हा' अनुभव रिंकू राजगुरूसाठी ठरला टर्निंग पॉईंट

Maharashtra Live News Update: बीडमध्ये दहावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ

Haldi Yellow Saree Designs: हळदीला पिवळ्या रंगाची साडी का नेसतात? माहितीये का?

Vastu Tips : घरात धातूचा कासव ठेवल्याने होतील 'हे' जबरदस्त फायदे, जाणून घ्या कासव ठेवण्याची योग्य पध्दत

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त, प्रति तोळा इतकी झाली किंमत, वाचा 22k, 22k गोल्डचे ताजे दर

SCROLL FOR NEXT