Eknath Shinde Latest News, Aditya Thackeray News, Shiv Sena News Today, Latest Marathi News
Eknath Shinde Latest News, Aditya Thackeray News, Shiv Sena News Today, Latest Marathi News Saam Tv
मुंबई/पुणे

आदित्य ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; थेट एकनाथ शिंदेच्या बालेकिल्यात शक्तीप्रदर्शन करणार

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या (Shivsena) ४० आमदारांनी बंड केल्यानं राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आता निष्ठा यात्रा काढणार आहे. या यात्रेत ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन शक्तीप्रदर्शन करणार आहे. इतकंच नाही तर, आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातही शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती आहे.

ज्यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी हे बंड झालं त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात देखील आदित्य ठाकरे शक्ती प्रदर्शन करणार आहेत. येत्या काही दिवसात आदित्य ठाकरे त्यासाठी ठाण्याचा दौरा करणार आहेत. लवकरच त्या संदर्भातली तारीख जाहीर केली जाणार आहे . आदित्य ठाकरे यांच्या संभाव्य दौऱ्यामुळे ठाण्यात मोठ्या संघर्षाची शक्यता वर्तवली जाते आहे. कारण ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या बंडामुळे उभी फूट पडलीय . कारण ठाण्यातले नगरसेवक आमदार सगळे एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाले आहेत, तर खासदार आणि कार्यकर्ते ठाकरेंसोबत आहेत. (Eknath Shinde Latest News

आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेची उद्यापासून सुरूवात होणार आहे. "निष्ठा यात्रेत" युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मुंबईतल्या 236 शाखांमध्ये जाऊन गटप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत . सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कडवट शिवसैनिकांनी शिवसेनेबद्दल दाखवलेली आत्मीयते बद्दल संवाद करत "निष्ठा यात्रा" सुरु होणार आहे. (Aditya Thackeray News)

याचवेळी शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या राज्यातील 40 बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे "निष्ठा यात्रे" दरम्यान दौरा करणार आहेत . या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांच्या भेटी, मेळावे आदित्य ठाकरे घेणार आहेत. या मतदार संघांमधील शिवसेनेशी एकनिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ देऊन शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे .

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singham Again Shooting In Jammu : 'सिंघम अगेन'च्या सेटवरून फायटिंगचा सीन व्हायरल; अजय- जॅकी एकमेकांना भिडले...

SRH vs PBKS: अखेरच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांची बॅट तळपली! हैदराबादसमोर विजयासाठी २१५ धावांची गरज

Today's Marathi News Live: पिंपरी चिंचवड शहरात आज पुन्हा वळवाच्या पावसाची हजेरी

Singapore Corona News |चिंता वाढली! सिंगापूरमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर

Yogi Adityanath: मोदी तिसऱ्यांदा PM झाल्यास 6 महिन्यात POK भारताच्या ताब्यात असेल, योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT