मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde) नाराजीनाट्य सुरु झालं. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आजचा पाचवा दिवस आहे. या मुद्द्यावर शिवसेनेने आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. मुंबईतील शिवसेना (Shivsena) भवनात आज दुपारी एक वाजता ही बैठक होणार आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सद्यस्थितीची माहिती देऊन पुढील सल्ला मागू शकतील. दरम्यान काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात होती त्यानंतर आता बंडखोर एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या नेते पदावरून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक बोलावण्यात आली आहे. आज होणाऱ्या या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हा निर्णय निर्णय घेण्याची शक्यता आहे. पक्षाच्या घटनेतही काही बदल केले जाण्याची शक्यता.
हे देखील पाहा -
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. एकनाथ शिंदे आणि तीसहून अधिक आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. बंडखोर एकनाथ शिंदे गटाने आधी सूरत त्यानंतर गुवाहाटीत मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे देशातील नागरिकांचं लक्ष राज्यातील राजकीय घडामोडींवर लागलं आहे. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदेंच्या वतींन सांगण्यात आलं.
शिवसेनेकडून बंडखोरांना ४८ तासांचा अल्टिमेटम; १६ आमदारांवर होणार कायदेशीर कारवाई
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यासाठी आता शिवसेनेने कायद्याची मदत घेत हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत शिवसेनेने विधानसभेचे उपाद्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहीलं आहे. यात एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. येत्या सोमवारपर्यंत परत या अन्यथा कारवाई करु असं म्हणत शिवसेनेकडून बंडखोरांना ४८ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ही माहिती दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.