MPSC Student Protest In Pune SAAM TV
मुंबई/पुणे

MPSC Exam : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं 14 तासंपासून आंदोलन सुरुच; राज्य सरकार काय भूमिका घेणार?

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच

Dnyaneshwar Choutmal

Pune MPSC Exam Student Protest : पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे. यात युवक काँग्रेसचे ५ कार्यकर्ते आमरण उपोषण करत आहेत.

याशिवाय मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अजूनही आंदोलनात बसूनच आहेत. ‘आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही ‘ असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. परीक्षा पद्धतीची नवी प्रणाली २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय जाहीर करा अशी मागणी त्यांनी सरकारकडे लावून धरली आहे. सरकारने फक्त निर्णय दिला असून जीआर आला नाही असा दावा विद्यार्थी करत आहेत.

या सगळ्यांमुळे विद्यार्थी (Student) संतापले आहेत. त्यानंतर नवा पॅटर्न लागू करणार असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पॅटर्न लागू करण्याची घाई झाली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. याबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हजारोंच्या संख्येने विद्यार्थी येथे रस्त्यावर उतरले आहेत. एमपीएससी परीक्षेचा (MPSC Exam) अभ्यासक्रम युपीएससी प्रमाणे याला आमचा विरोध नाही. मात्र त्यासाठी आम्हाला थोडा वेळ हवा आहे, असं विद्यार्थ्यांच मत आहे.

या आधी देखील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी सरकारकडून विद्यार्थ्यांना दिलासादायक आश्वासने देण्यात आली. मात्र अद्यापही विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण मान्य करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

'या' आहेत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या

नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा.

पॅटर्न लागू करण्याची घाई करु नये.

अभ्यास करण्यासाठी किमान 5 ते 6 महिने वेळ मिळावा.

नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या (UPSC) अभ्यासक्रवार आधारित आहे त्यामुळे पुस्तकं उपलब्ध नाहीत. त्यात सुधारणा करण्यात यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Gas Cylinder: फक्त ३०० रूपयांत गॅस सिलिंडर, राज्य सरकारची मोठी घोषणा, लाखो लोकांना होणार फायदा

'अहो आज रात्री तरी..' नवरा दूर-दूर, बायकोकडून शरीरसंबाधासाठी पुढाकार, पतीनं गुप्तांगाला चटके देत केला छळ

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत अचानक घसरण, इतकं झालं स्वस्त, वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

Tejaswini Lonari : "हलद लाविते गं..."; सरवणकरांची होणारी सून हळदीत रंगली, पाहा खास PHOTOS

Putin India Visit: ४ वर्षांनंतर व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर, ३० तासांचा मेगाप्लान; १० लाख नोकऱ्या आणि अणुकराराची शक्यता

SCROLL FOR NEXT