Ajit pawar, Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

प्रत्येकाने बोलताना मर्यादा ठेवायला हवी; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांनाच सुनावले

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे पहिल्या पावसाळी अधिवेशनातील पहिले तीन दिवस वादळी ठरले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारचे पहिल्या पावसाळी अधिवेशनातील पहिले तीन दिवस वादळी ठरले आहेत. आज चौथा दिवस आहे. आजचा दिवसही वादळी ठरण्याचा अंदाज आहे. दरम्यान, काल मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना करुणा शर्मावरुन अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता. यावरुन आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा समचार घेतला.

विधान सभेत बोलताना प्रत्येकाने बोलताना मर्यादा पाळायला हवी अशा शब्दात अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सुनावले आहे.

काल विधानसभेत बोलताना अगोदर आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यावर उत्तर देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला. 'तुमचा सगळा प्रवास मला माहीत आहे, देवेंद्र फडणवीस यांनी एकदा दया, माया, करुणा दाखविली पण परत परत दाखविता येणार नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी मुंडेंना टोला लगावला होता. यावर आज अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सुनावले आहे.

अजित पवार काय म्हणाले?

'आम्ही सभागृहात जागृत राहून काम करत असतो. काही जण बोलता बोलता समोरून प्रतिसाद मिळाला तर एखादा शब्द त्यांच्या तोंडून जातो. पण प्रत्येकानं बोलताना एक मर्यादा ठेवायला हवी. आपल्याकडून काही चूक होऊ देता कामा नये अशा शब्दात अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना सुनावले. सभागृहात आरोप-प्रत्यारोप होतच असतात. आम्ही आमची भूमिका मांडतो असतो, सत्ताधारी पक्ष त्यांची भूमिका मांडतात. फक्त माझं मत आहे की वैयक्तिक निंदा-नालस्ती कधीच कुणी कुणाची करू नये. महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती, परंपरा आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामाचा एक दर्जा आहे. असंही अजित पवार (Ajit Pawar) यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जे घरी बसले त्यांनी देखील कायमचं घरी बसवले, शिंदेचा ठाकरेंवर हल्लाबोल

Maharashtra Politics: मुंबईत दोस्ती तर पुण्यात कुस्ती; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून ठाकरे गटाने थोपटले दंड

Homemade Date Chutney: आंबटगोड खजूर चटणीची परफेक्ट रेसिपी, जाणून घ्या झटपट पटापट

Crime: मुलीला शेतात खेचत नेलं, तिघांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

Municipal Corporation Elections: महापालिकेसाठी काँग्रेसने कंबर कसली, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT