Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates:  Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Marathi vijay melava live updates : हिंदी सक्तीच्या विरोधात राज्य सरकारने नरमाईची भूमिका घेतली, त्यामुळे मुंबईमध्ये विजयी मेळावा साजरा करण्यात येत आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे विशेष लक्ष लागले आहे. या संदर्भातील सर्व लाईव्ह अपडेट थोडक्यात जाणून घेऊयात...

Namdeo Kumbhar

एकमेकांना पेढे भरवत, ढोल ताशाच्या गजरात आनंदोत्सव साजरा

धाराशिवच्या कळंब शहरात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केलाय. आज मुंबईत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत त्रिभाषा सूत्र रद्द केल्याबद्दल विजय मेळावा होत असुन याच संदर्भात शिवसेना ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला. यावेळी ठाकरे बंधू आगे बढो च्या घोषणा देण्यात आल्या.

भाषेवरून विषय वरवरचा निघून चालणार नाही. मधल्या काळात यांनी वापरून फेकून दिलं. आता आम्ही वापरणार आणि फेकणार.
उद्धव ठाकरे

Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates: लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद केलं. आता नव्याने नोंदणी होणार नाही. बसा बोंबलत. देशात सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र थांबणार नाही. कर्ज काढतच राहणार - उद्धव ठाकरे

हा प्रिमियर असेल, पण आजपासून सुरूवात झाली आहे. एकतर आम्ही कुणाशी दादागिरी करणार नाही. पण कुणी दादागिरी केली तर आम्ही सहनही करणार नाही. - ठाकरे

कोणाची माय व्यायली त्यानं मुंबईला हात लावून दाखवावा. भाषेच्या आड हे मुंबईला चाचपडून घेत आहेत. पण आम्ही गां... नाही.
- राज ठाकरे

काल एक गद्दार बोलला जय गुजरात. किती लाचारी. - उद्धव ठाकरेंचा शिंदेंना जोरदार टोला

Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates: आपण पुन्हा एकत्र आलोय. पुन्हा आपल्यामध्ये काड्या घालतील - ठाकरे

Marathi bhasha 5 July live news updates मुख्यमंत्री असताना मी हिंदीची सक्ती केली नाही - ठाकरेंचे स्पष्टीकरण

Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates:  महाराष्ट्रात मराठीचे शत्रू कोण? - ठाकरे

इकडे शेतकऱ्याला शेती करायला बैल मिळेना. तिकडे मोदी घानामध्ये पुरस्कार घेत आहेत - ठाकरे

भाषावार प्रांतरचना ही भाषा आहेत म्हणून झालेना. संरक्षण दलातील सर्व रेजिमेंट एकत्र येऊन तुटून पडतात ना.मराठी माणूस म्हणून सर्व एकत्र आलेत. आता जातीवरून राजकारण सुरू करतील.. काल मीरा भाईंदरमध्ये गुजराथीला मारलं असं सुरू केलं. अजून तर काहीच केलेलं नाही.
राज ठाकरे

मराठी माणसाने लढून मुंबई मिळवली आहे. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही, असे फडणवीस म्हणाले. पण जर मराठीसाठी आंदोलन करत असेल आणि तुम्ही त्याला गुंड म्हणत असाल तर आम्ही आहोत गुंड. जर गुंडगिरी केल्याशिवाय न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच - उद्धव ठाकरे

भाजप ही अफवाची फॅक्ट्री आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अशी अफवा उठवली. पण आम्ही तुमच्यापेक्षा जास्त कडवट हिंदुत्व आहे. - उद्धव ठाकरे

Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates: आज अनेक बुवा, महाराज बिझी आहेत. कोण लिंबू कापतेय. कोण रेडे कापत असेल. त्या सर्वांना सांगतोय. त्या भोंदूपणाविरोधात आजोबांनी लढा दिला होता. आता आम्ही एकत्र उभे आहेत - उद्धव ठाकरे

आमच्या दोघातील अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला. एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Marathi bhasha Vijay Live Updates : आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसणं महत्वाचं आहे - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijay Sabha LIVE Updates: राज ठाकरेंनी अप्रतिम मांडणी केली. माझ्या भाषणाची गरज आहे असं वाटत नाही. - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijay Sabha LIVE Updates: जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. पण चूक त्यांचीच असली पाहिजे. पण अशी कोणताही गोष्ट कराल तर व्हिडिओ काढू नका - राज ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijay Sabha LIVE Updates:

हिंद प्रांतावर १२५ वर्षे मराठ्यांनी राज्य केले. आम्ही कधी मराठी लादली का? गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब कुठेही मराठी लादली नाही. हिंदी भाषा २०० वर्षांपूर्वीची भाषा आहे. महाराजांच्या काळातही ती भाषा नव्हती. कुणासाठी आणि कशासाठी काय करायचं आहे नेमकं? यांनी फक्त चाचपडून पाहायलं. मुंबई स्वातंत्र्य करता येतेय का? त्यासाठी चाचपडून टाकलं. महाराष्ट्राला, मुंबईला हात घालून दाखवावे. आम्ही सांगतोय याचा अर्थ ...डू नाही. काहीही अंगावर लादायचा प्रयत्न करता. माघार घेतलं त्याचं काय करायचं. वेगळ्या ठिकाणी सगळं प्रकरण वळवा. ठाकरेंची मुलं इंग्रजीमध्ये शिकली. पुढे काय? कुठे काय शिकलो याचा काय संबंध?

Raj-Uddhav Thackeray Vijay Sabha LIVE Updates: हिंदी कुणासाठी शिकायचं? हिंदी भाषेबद्दल मला वाईट वाटत नाही, कोणतीही भाषा मोठीच असते. ती उभारायला प्रचंड ताकद लागते. भाषा अशाच उभा राहत नाहीत. - राज ठाकरे

Marathi bhasha 5 July live news updates : हिंदी सक्तीचे अचानक कुठून आले, ते मला समजलेच नाही. हिंदी कशासाठी? कोणासाठी हिंदी? त्या लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही? कुणालाही न विचारता आम्ही ते लादणार असे झाले. तुमच्या हातात सत्ता असेल, ती विधानभवनात. आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर - राज ठाकरेंचा सरकारला इशारा

Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates:  आजचा हा मेळावा, मोर्चा आणि मेळाव्याला तीच घोषणा आहे. कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अंजेंडा. माझ्या मराठीकडे कुणी वेड्या वाकड्या नजरेनं पाहायचं नाही - राज ठाकरे

Marathi bhasha Vijay Live Updates :  कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं मी मुलाखतीत म्हटलं होतं. आज २० वर्षानंतर आम्ही एका व्यासपिठावर येत आहे. बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमल - राज ठाकरे

आज मोर्चा निघायालाच पाहिजे होता. मोर्चामध्ये मराठीच्या एकतेचं चित्र दिसले असते. - राज ठाकरे

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, स्टेजवर दोन्ही बंधू एकत्र

वरळी डोम येथील हॉल हाऊसफुल झाल्याने बाहेर असलेल्या स्क्रीनसमोर मराठी प्रेमींची तुफान गर्दी झाली. यावेळी 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत सर्वांनी एकसुरात म्हटले.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates: मूळ शिवसेना मराठी मुद्द्यावर जन्माला आली आहे. याच मुद्द्यावर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मेळावा होत आहे. या मेळाव्याला माझ्या शुभेच्छा आहेत. मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत. दोन भवानी एकत्र यावे अशी लोकांची इच्छा आहे. आम्हाला सुध्दा असे वाटत की ते एकत्र यावे पण अस होणार आहे का?

Marathi bhasha Vijay Live Updates : राज ठाकरे-उद्धव ठाकरे मेळाव्यासाठी रवाना, थोड्याच वेळात तोफ धडाडणार

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात ते वरळी डोम येथे पोहचतील. तिथे कार्यक्रमस्थळी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.

सर्व विसरून ठाकरे बंधू एकत्र ही मोठी गोष्ट, तेजस्विनी पंडीतचं विधान

विजयी मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून ठाकरेंचे कार्यकर्ते दाखल होत आहे. मराठी कलाकारही या मेळाव्याला उपस्थित राहिले आहेत. यावेळी तेजस्विनी पंडीत हिने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. सर्व विसरून ठाकरे बंधू एखत्र आले, ही मोठी गोष्ट असल्याचे मत तिने व्यक्त केले. पाहा नेमकं ती काय म्हणाली?

Marathi vijay melava live updates : उद्योजक सुशील केडियाचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं

Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates :  उद्योजक सुशील केडियाचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं. मराठीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राज ठाकरे यांना ट्वीट करत केलं होतं आव्हान

Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates:  विजयी मेळाव्यासाठी वरळी डोमबाहेर मोठी गर्दी

Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates: आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा साजरा करणारेय. मुंबईतील वरळी डोम इथं ठाकरेसेना आणि मनसेचा भव्य एकत्रित मेळावा होणारेय. विजयी मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतील. सकाळी 11.30 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे डोमला पोहोचतील. कुणीही आपल्या पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह घेऊन येऊ नये, असं आवाहन करण्यात आलंय. तब्बल 2 दशकांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यानं मोठी उत्सुकता आहे.

Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates: ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates : महाराष्ट्रासाठी हा सुवर्णक्षण आहे. ठाकरेंनी साद घातली अन् महाराष्ट्राने प्रतिसाद दिला नाही, असे कधीच झाले नाही. हा आतापर्यंतचा इतिहास आहे.

Marathi bhasha Vijay Live Updates : ग्रँड एन्ट्री होणार, वरळी डोममध्ये राज ठाकरेंची व्हॅनिटी व्हॅन दाखल, पाहा व्हिडिओ

Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates : हातात गुढी घेऊन , डोक्यावर फेटे, मनसैनिक विजयी मेळाव्याला निघाले

Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates: आज राज आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा होत आहे. यासाठी मुंबई मधून मनसैनिक कार्यक्रमस्थळी रवाना होताना दिसत आहे. या वेळी मराठी साज आणि मराठी सण उत्सवाला या मेळाव्याशी जोडले जात आहे. चेंबूरमध्ये मनसे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मनसैनिक मेळाव्याला निघाले आहेत. या वेळी हातात गुढी घेऊन , डोक्यावर फेटे बांधून वाजत गाजत मनसैनिक आनंद व्यक्त करीत आहेत.एकोणीस वर्षानंतर हा क्षण आला आहे जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मंचावर येणार आहे, हा आमच्या साठी आनंदाचा क्षण आहे अशी प्रतिक्रिया या. वेळी मनसेचे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांनी दिली आहे.

Marathi bhasha Vijay navi mumbai  Live Updates : नवी मुंबईमधून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates: मनसेचे पदाधिकारी मुंबईला रवाना मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. मुंबईत विजयी मेळावा पार पडतोय याच मेळाव्यासाठी दोन ठाकरे नेते एकत्र येत आहेत. त्यामुळे मनसैनिकांना सुद्धा दोन ठाकरे एकत्र येत असल्यामुळे आनंदाचा वातावरण आहे. नवी मुंबई शहरात सुद्धा कार्यकर्त्यामध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

Marathi vijay melava live updates : वरळीमध्ये होत असलेल्या ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांनीही उपस्थिती लावायला सुरूवात केली आहे. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, तेजस्वीणी पंडीत यांच्यासह अनेक मराठी कलाकार मेळाव्याला आले आहेत.

Marathi vijay melava live updates : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन मराठी भाषा जल्लोष उत्सव कार्यक्रमाला रवाना

Marathi bhasha mumbai worli Dome live updates :छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन मनसैनिक मराठी भाषा जल्लोष उत्सव कार्यक्रमाला रवाना

मनसे वर्सोवा विधानसभा अध्यक्ष संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मनसैनिक वरळी डोम कडे जाण्यासाठी निघाले

विलेपार्ले येथील पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे दर्शन घेऊन मनसैनिक वरळी डोमकडे जाण्यासाठी निघाले

मनसैनिकांमध्ये मराठी भाषा जल्लोष उत्सवचा उत्साह

Marathi vijay melava live updates :  मराठीचा जागर करण्यासाठी ठाण्यातून नितीन राज चव्हाण निघाले

Marathi bhasha mumbai worli Dome live updates : मराठीचा जागर करण्यासाठी ठाण्यातून एक नितीन राज चव्हाण नावाचा अवलिया वरळीच्या डोमे या ठिकाणी पोचणार आहे. त्यांनी खत्री चक्क मराठी गीत आणि मराठी अभिमान गीताच्या माध्यमातून त्यांनी आपली कलाकृती सादर केली असली तरी दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि अशा प्रकारे आल्यानंतर मराठीचा विजय होईल असं देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे.

Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates

जय गुजरात, जय उत्तर प्रदेश म्हटल्याने आपण छोटे होतो का? सनी देवोलच्या एका सिनेमामध्ये त्याला पाकिस्तान जिंदाबाद म्हणायला सांगितलं आणि तो म्हणाला... त्यामुळे कोणाला जिंदाबाद म्हणायचं मग अडचण नाहीये .. पण माझ्या देशाबद्दल काही गैर शब्दाचा उपयोग केला तर ते मला सहन होणार नाही.
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते

Marathi vijay melava live updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट 

Marathi bhasha Vijay Live Updates : उल्हासनगरमधून कार्यकर्ते रवाना

Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates:  उल्हासनगर रेल्वे स्थानकात शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते जमा झाले असून मनसेचे उपाध्यक्ष सचिन कदम शिवसेनेचे शहर कैलास तेजी यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यकर्ते विजय मेळाव्यासाठी जात आहेत

Uddhav Thackeray Raj Thackeray ना जलेबी ना फाफडा उद्धव ठाकरे आपडा, ठाकरेंचे मुंबईत बॅनर

Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates:  शिवसैनिक आणि मनसैनिक हे आता वरळीकडे निघाले

Marathi bhasha mumbai worli Dome live updates : मराठी विजय मेळाव्यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक हे आता वरळीकडे निघाले आहेत. मुंबई बाहेरील कार्यकर्ते तर रात्रीच मुंबई परिसरात दाखल झाले असून आता कांदिवली परिसरातून देखील मनसैनिक मोठ्या प्रमाणावर वाजत गाजत वरळीतील विजय सभेसाठी निघाले आहेत. मनसे प्रवक्ते हेमंत कांबळी आणि विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मनसैनिक कोळी बँडच्या तालावर नाचत निघाल्याचे पाहायला मिळत आहे

Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates: नवी मुंबई वाशी वरून ठाकरे गटाचे पदाधिकारी मुंबईसाठी रवाना

आज मुंबईमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत विजय मेळावा मुंबईत पार पडतोय याच मेळाव्यासाठी नवी मुंबई शहरातून ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी मुंबईसाठी रवाना झाले आहेत बस प्रवास करणार आहेत त्यामुळे ठाकरे गटामध्ये दोन बंधू एकत्र येत असल्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झालंय त्यांच्याशी खास बातचीत केले आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी

Marathi bhasha mumbai worli Dome live updates : कल्याणहून मनसे व शिवसेना कार्यकर्ता एकत्र येत ढोल ताशांच्या गजरात निघाले

Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates: आज मुंबईतील वरळी डोममध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर, कल्याणमधून मोठ्या संख्येने शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र जमत कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करत ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळत, शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले यावेळी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर आणि ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाळा परब

त्यांनी “दोन्ही भाऊ एकत्र येणार, काय बोलणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे... आजचा मेळावा ऐतिहासिक ठरणार आहे! आम्ही ढोल ताशांच्या गजरात ठाणे, डोंबिवली, कल्याणहून कार्यकर्ते मेळाव्यासाठी जात आहोत आणि आमचे साहेब काय बोलणार याची आम्हाला उत्सुकता लागली आहे

आज होणाऱ्या मराठी माणसाच्या विजयी जल्लोषाला मनःपूर्वक शुभेच्छा! ही मराठी एकजूट अधिकाधिक घट्ट होवो, ही अपेक्षा! महाराष्ट्रात राहणाऱ्या कुठल्याही राज्यातील व्यक्तीच्या आचरणात #महाराष्ट्रधर्म असेल आणि महाराष्ट्र व मराठीवर त्याचं प्रेम असेल तर तो आमच्यासाठी मराठीच आहे. आमचा कोणत्याही इतर भाषेला विरोध नाही पण मराठी भाषेचा द्वेष करून कुणी इतर भाषा आमच्यावर लादत असेल तर ते चालणार नाही..
रोहित पवार, राष्ट्रवादी आमदार

Marathi bhasha mumbai worli Dome live updates ठाकरेंनी एक पक्ष काढावा, भाजप नेत्याचे मोठं वक्तव्य

Marathi bhasha Vijay Live Updates : शक्य असल्यास ठाकरे बंधूंनी एकच पक्ष काढावा, असे वक्तव्य भाजप नेते सुनीर मनगुंटीवार यांनी केले आहे.

Marathi bhasha Mumbai Worli Dome live updates नवी मुंबई वाशी रेल्वे स्टेशन वरून ठाकरे गटाचे पदाधिकारी मुंबईसाठी रवाना

Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates: आज मुंबईमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत विजय मेळावा मुंबईत पार पडतोय याच मेळाव्यासाठी नवी मुंबई शहरातून ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी मुंबईसाठी रवाना झाले आहेत रेल्वेने प्रवास करणार आहेत त्यामुळे ठाकरे गटामध्ये दोन बंधू एकत्र येत असल्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झालंय त्यांच्याशी खास बातचीत केले आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी

Marathi bhasha mumbai worli Dome live updates : संदीप देशपांडेंच्या खास टीशर्टची चर्चा

Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha LIVE Updates: तब्बल १८ वर्षांनंतर मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. दोन बंधू एकत्र येत असल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आहे. अशातच या विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंनी खास टीशर्ट घातला आहे. 'आवाज मराठीचा' असं कॅप्शन टीशर्टचा फोटो शेअर करताना संदीप देशपांडेंनी दिलं आहे.

Marathi bhasha mumbai worli Dome live updates : उद्धव आणि राज ठाकरे यांचा एकत्रित एल्गार

मराठी तितुका मेळवावा! आज विजयी मेळावा! गजर होऊ दे, पताका फडकू दे, वाजतगाजत, गुलाल उधळत या; उद्धव आणि राज ठाकरे यांचा एकत्रित एल्गार

Marathi bhasha mumbai worli Dome live updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

पालघरमधील मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. पालघर येथील मनसैनिक तुलसी जोशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना दादर परिसरात घेतले ताब्यात

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका

त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर सरकारनं रद्द केल्यावर आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा साजरा करणारेय. मुंबईतील वरळी डोम इथं ठाकरेसेना आणि मनसेचा भव्य एकत्रित मेळावा होणारेय. विजयी मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतील. सकाळी 11.30 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे डोमला पोहोचतील. कुणीही आपल्या पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह घेऊन येऊ नये, असं आवाहन करण्यात आलंय. तब्बल 2 दशकांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यानं मोठी उत्सुकता आहे.

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात कोण कोण भाषण करणार?

Marathi bhasha mumbai worli Dome live updates : बॅनरबाजीतून फडणवीसांना टोला

वरळी डोमच्या बाहेर आम्ही गिरगावकर यांनी पोस्टर लावला आहे. या पोस्टर वरती महाराष्ट्र माझा बाळासाहेबांचा फोटो व उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र पाहायला मिळत आहेत.

जी मराठी लोक चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेले आहेत .त्यांनी परत मुंबईत ठाकरे बंधूंकडे या नाहीतर कायमचे गुजरातला पोहोचाल असा उल्लेख बॅनरवर पाहायला मिळतोय..

Marathi vijay melava live updates : वरळी डोमच्या बाहेर बॅनरबाजी

वरळी मध्ये आवाज मराठीचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत विजय सभा

वरळी डोमच्या बाहेर बॅनरबाजी

आवाज मराठीचा कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचाच अजेंडा असा बॅनर वर उल्लेख

तर आवाज मराठीचा लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी..

उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचे फोटो त्याचबरोबर विठ्ठल व ज्ञानेश्वर माऊलींचा बॅनर फोटो

Marathi bhasha vijay live updates : राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यावेत

आवाज मराठीचा विजय उत्सव आज साजरा होता. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी शिवसैनिकांची तिला अनेक वर्षाची इच्छा होती त्याच पूर्ण होताना दिसत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक वरळी मध्ये दाखल झाले आहेत. पुण्याचे मोहन यादव उद्धव यादव यांनी सजवलेली बाईक या ठिकाणी आणली आहे. या बाईक वरती आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख पाहायला मिळत आहे.

Marathi bhasha vijay live updates : राजन विचारांनी लावला बॅनर, नेमकं काय आहे त्यावर?

आज मुंबई येथे विजय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या साठी ठाणे अणि मुलुंड मध्ये असणार्‍या मुलुंड टोल नाका या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांच्या वतीने एक भव्य दिव्य बॅनर लावण्यात आला आहे. त्या बॅनर वर उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या बरोबर शरद पवार प्रबोधन कार ठाकरे, सेनेचे ठाण्यातील दिवंगत नेते आनंद दिघे यांचे

Marathi bhasha vijay live updates : मुंबईमध्ये जमले मनसैनिक

मुंबईला होणाऱ्या विजय मेळाव्यासाठी नाशिक मनसे कार्यालयावर मनसे पदाधिकारी जमले आहे थोड्याच वेळात ते मुंबईच्या दिशेने विजय मेळाव्यासाठी जाणार आहे

Marathi vijay melava live updates : नाशिकमधून शेकडो मनसैनिक मुंबईकडे रवाना

नाशिक मनसे कार्यकर्ते पदाधिकारी थोड्याच वेळात नाशिक मधून मनसेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईला होणाऱ्या विजय मेळाव्यासाठी होणार रवाना होणार आहे

Marathi bhasha vijay live updates : विजयी मेळावा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Marathi vijay melava live updates : हिंदी सक्तीच्या विरोधात राज्य सरकारने नरमाईची भूमिका घेतली, त्यामुळे मुंबईमध्ये विजयी मेळावा साजरा करण्यात येत आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे विशेष लक्ष लागले आहे. या संदर्भातील सर्व लाईव्ह अपडेट थोडक्यात जाणून घेऊयात...

आज सकाळी दहा वाचल्यापासून वरळी डोम येथे या कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. शिवाजी पार्कला परवानगी मिळाली नाही, त्यामुळे ठाकरेंनी वरळी डोम येथे कार्यक्रम घेण्याचं ठरवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

SCROLL FOR NEXT