Mahanand Dairy: Saam Tv
मुंबई/पुणे

Mahanand Dairy : 'महानंद'चा कारभार नॅशनल डेअर बोर्ड पाहणार; ५ वर्षांचा झाला कारभार

Mahanand Dairy News : महानंद डेअरी संदर्भातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महानंद डेअरी कारभार आता नॅशनल डेअरी बोर्डाकडे आला आहे.

Vishal Gangurde

गणेश कवडे, मुंबई

मुंबई : महानंद डेअरी संदर्भातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महानंद डेअरी कारभार आता नॅशनल डेअरी बोर्डाकडे आला आहे. महानंद डेअरी तोट्यात असल्याने याबाबत नॅशनल डेअरी बोर्डाला कळवलं होतं. त्यानंतर राज्य सरकारने नॅशनल बोर्डसोबत करार केला. त्यानंतर आता महानंद डेअरी ही मदर डेअरी सांभाळणार आहे. डेअरीच्या तोट्यामुळे सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे.

महानंद राज्यातील सहकारी दूध संस्थाची शिखर संस्था आहे. या महानंद डेअरीचे २५ जिल्हा संघ आणि ६० तालुका दूध संघ सभासद आहेत. या डेअरशी २५ लाख दूध उत्पादक निगडित आहेत. गेल्या काही महिन्यांपासून महानंदची आर्थिक स्थिती बिकट आहे. याच महानंदची डेअरी आता मदर डेअर चालवणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महानंद डेअरी तोट्यात गेल्यामुळे नॅशनल डेअर बोर्डाकडे गेली आहे. नॅशनल डेअरी बोर्डाच्या अनेक उप कंपनी आहे. त्यापैकी मदर डेअरी ही उपकंपनी आहे. या कंपनीला ही डेअरी देण्यात आली आहे. या कंपनीतून निघणारे उत्पादन हे महानंद नावानेच निर्माण केले जाणार आहे.

त्यामुळे मदर डेअरी हे 'महानंद'च्या नावाने जरी उत्पादन काढणार आहे. त्यामुळे तोट्यात गेलेल्या डेअरी बाहेर काढण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही डेअरी पुढे फायद्यात येणार का, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

Relationship Advice : जोडीदाराशी बोलताना ‘या’ ८ गोष्टी टाळा; नाही तर तुटू शकतं नातं

SCROLL FOR NEXT