Amol Kolhe News: Saamtv
मुंबई/पुणे

Amol Kolhe News: 'घड्याळ' गेलं, वेळ जुळेना, सुखाची 'तुतारी' वाजली पाहिजे; लग्नसोहळ्यात अमोल कोल्हेंच्या राजकीय शुभेच्छा; नेमकं काय घडलं?

Maharashtra Loksabha Election: शिरुरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी लग्न समारंभात अजित पवारांचे घड्याळ अन् शरद पवारांच्या तुतारीचा मेळ घालत दिलेल्या वधु-वरांना दिलेल्या राजकीय शुभेच्छांची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. ३१ मार्च २०२४

Shirur Loksabha Constituency News:

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचारसभांचा धडाका पाहायला मिळत आहे. लोकसभेच्या रिंगणात उतरलेले अनेक नेत्यांनी गावोगावच्या भेटी, कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा धडाका लावला आहे. अशातच शिरुरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी लग्न समारंभात अजित पवारांचे घड्याळ अन् शरद पवारांच्या तुतारीचा मेळ घालत दिलेल्या वधु-वरांना दिलेल्या राजकीय शुभेच्छांची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

नेमकं काय घडलं?

शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच अमोल कोल्हे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शनिवारी अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतणीच्या लग्नसोहळ्यास हजेरी लावली.

या विवाह सोहळ्यातही खासदार कोल्हे यांनी तुतारीचा प्रचार करण्याची संधी मात्र सोडली नाही. विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यास उशीर झाल्यामुळे कोल्हे यांनी "घड्याळ निघून गेल्यामुळे वेळ जुळेना" पण "वधूवरांच्या आयुष्यात सुखाची, समाधानाची तुतारी वाजावी" अशा मिश्किल शब्दांत शुभेच्छा देत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या राजकीय टोलेबाजीने दिलीप मोहिते पाटलांनाही हसू आवरता आले नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच यावेळी अमोल कोल्हे यांनी (Amol Kolhe) दिलीप मोहिते यांच्या पत्नीचे चरण स्पर्श केले. आणि तुम्ही मला आशीर्वाद दिला की मी तो अप्रत्यक्षपणे आमदार दिलीप मोहितेंनी मला खासदारकीसाठी आशीर्वाद दिला असं समजतो अशी प्रतिक्रिया दिली. अमोल कोल्हेंच्या या कोपरखळीने पुन्हा एकदा हशा पिकल्याचे पाहायला मिळाले. (Loksabha Election 2024)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

OBC Reservation: ओबीसींचं राजकीय आरक्षण संपलं?

Maharashtra Live News Update: बनावट रक्त चाचणीचे अहवाल देऊन विमा कंपनीची फसवणूक

Pune Crime: पुणे स्टेशनवर जबरी चोरीचा थरार! पैसे न दिल्याने पोटात भोसकला चाकू

PM मोदींसह आईचा AI व्हिडिओ पोस्ट केला, आता पोलिसांची मोठी कारवाई; काँग्रेससह आयटी सेलवर गुन्हा

SCROLL FOR NEXT