NCP leader and former sarpanch Nirmala Navale addressing the media after making serious allegations about election malpractice. saamtv
मुंबई/पुणे

पंचायत समितीच्या निवडणुकीत ड्रग्जचा वापर? कार्यकर्त्यांना ड्रग्ज दिलं; राष्ट्रवादीच्या नेत्या निर्मला नवले यांचा आरोप

Nirmala Navale Alleges Drug Use In Election: पंचायत समिती निवडणुकीदरम्यान पक्षाच्या कार्यकर्त्यांना ड्रग्ज देण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या निर्मला नवले यांनी केलाय आहे. या दाव्यांमुळे महाराष्ट्रात राजकीय वादंग निर्माण झाला. कारेगाव पंचायत गटात झालेल्या या निवडणुकीत नवले यांचा ३२९ मतांनी पराभव झाला आहे.

Bharat Jadhav

  • पंचायत समिती निवडणुकीत ड्रग्ज वापराचा गंभीर आरोप

  • माजी सरपंच निर्मला नवले यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • निवडणूक प्रक्रियेवर आणि राजकारणावर प्रश्नचिन्ह

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

कारेगावच्या माजी सरपंच आणि सोशल मीडिया स्टार निर्मला नवले यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केलेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत घोळ झाल्याचा आरोप करत विरोधकांनी ड्रग्जचा वापर केला. कार्यकर्त्यांना ड्रग्ज देण्याचा आल्याचा आरोप नवले यांनी एका व्हिडिओतून केलाय. पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले या सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. नवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंचायत समितीची निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांचा दारूण पराभव झाला.

या पराभवानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली, त्यात त्यांनी मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचा आभार मानले. आज त्यांनी एक व्हिडिओ प्रासारित करत निवडणूक प्रक्रियेवर आरोप केले. राजकारण खराब असून ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांनी निवडणुका लढवाव्यात, असं त्या व्हिडिओमध्ये म्हणाल्या. यावेळी त्या भावूक झाल्या होत्या. या व्हिडिओमध्ये त्यांनी विरोधकांवर आरोप केलेत. पंचायत निवडणुकीत पैसा, बोगस मतदान आणि ड्रग्जचा वापर झाला असा गंभीर आरोप निर्मला नवले यांनी केला.

काय म्हणाल्या निर्मला नवले?

निवडणुकीत पैसा जिंकला, माणूस हरला, पण माझा लढा सुरूच राहील. या निवडणुकीत पैशाचा आणि ड्रग्जचाही वापर करण्यात आला. पुढे त्या म्हणाल्या, माझा हा ३०० मतांनी झालेला पराभव अनपेक्षित आहे, पण ज्या ६५७७ मतदारांनी विश्वास दाखवला, त्यांची मी मनापासून ऋणी आहे. या निवडणुकीत पैसा, बोगस मतदान जिंकला, पण माणूस हरला. हे कटू सत्य आहे. पण आज माझे काय मतदार काही पैशांसाठी पाच वर्षांकरिता विकले गेले, हे गोष्ट मला अस्वस्थ करतेय. या निवडणुकीत विरोधकांनी दारूबरोबरच ड्रग्सचा वापर केला गेला. निवनडणुकीच्या काळात तरुण कार्यकर्ते रात्रीभर जागे राहावेत.

यासाठी ड्रग्जचा वापर केला गेला. याचा गंभीर परिणाम येणाऱ्या काळात दिसून येणार आहे. माझ्या गावातील ३० ते ४० तरुण ड्रग्सच्या आहारी गेली. तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी जात असं बर्बाद होताना पाहणं हे अत्यंत चिंताजनक आहे. आजच्या राजकारणात समस्या, आणि पक्ष निष्ठा वेशीला टांगण्यात आलीय. आज कोणता उमेदवार जास्तीत जास्त पैसा वाटतो हेच निकष ठरले आहेत. राजकारणात येताना अधिक पैसा कमावला पाहिजे , आणि निवडणूक आल्यानंतर ते वाटावेत असं नवले या व्हिडिओ म्हणाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thailand shooting: १८ वर्षीय मुलाकडून शाळेत अंदाधुंद गोळीबार; २२ विद्यार्थ्यांसह ३४ जणांचा मृत्यू

Coconut Oil For Long Hair: लांब केसांसाठी खोबरेल तेल कसे लावायचे? जाणून घ्या योग्य पद्धत

विरोधात प्रचार का केलास? अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाच्या घरात घुसून हल्ला

Maharashtra Live News Update: शिर्डीतून धनगर आरक्षणाच्या पुढील लढाईचा एल्गार

Accident: मुंबई-आग्रा महामार्गावर अपघाताचा थरार, पोलिसांच्या वाहनानं व्यावसायिकाला चिरडलं; जागीच सोडले प्राण

SCROLL FOR NEXT