lakshman jagtap, Mukta Tilak Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Legislative Council Elections: काँग्रेसने लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानाला घेतला आक्षेप

आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत विधान परिषदेचा निकाल येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आज विधानपरिषदेसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्व आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीवरुन (Election) महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता काँग्रेसने भाजपच्या दोन आमदारांविरोधात आक्षेप नोंदवला आहे. या संदर्भात काँग्रेसने निवडणूक आयोगाला तक्रार दिली आहे. या संदर्भात आता निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. (Maharashtra Legislative Council Elections)

काँग्रेसने भाजपचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानाला आक्षेप घेतला आहे. मतदान करताना मतपत्रिकेवर सही केली पण पसंतीची मत देताना दुसऱ्याची मदत घेतली, असा आरोप काँग्रेसने (Congress) भाजपच्या या दोन मतांवर आक्षेप घेतला आहे. गुप्त मतदान असताना दुसऱ्यांची मदत घेतल्याने ही हरकत घेतली आहे.

हे देखील पाहा

काँग्रेसने भाजपच्या (BJP) दोन मतांवर आक्षेप घेतला आहे. यावर बोलताना अतुल लोंढे म्हणाले, हे गुप्त मतदान आहे, यात कोणाचीही मदत घेता येत नाही. हे अशा पद्धतीने मतदान करणे चुकीचे आहे. नियमाच्या बाहेर जावून मतदान करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची दोन मत रद्द झाली पाहिजेत. त्यांनी आयोगाकडे काही तशी मदत मागितली होती का हे पाहावे लागणार आहे.

मत पत्रिका वाचून त्यावर सही करावी लागते आणि मत देताना ते गुप्त करावे लागते, हे मत त्यांनी दाखवून केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे, त्यामुळे यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. आता यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे. भाजपसाठी एक, एक मत हे महत्वाचे आहेत.

या संदर्भात बोलताना भाजपचे अतुल भातखळकर म्हणाले, त्यांनी कशा पद्धतीने मतदान केले हे व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. काँग्रेस हा एक वेगळ्या मानसिकतेचा आहे आहे, त्यामुळे त्यांनी हा आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोग जो निर्णय घेईल त्यावर आमचा विश्वास आहे, असंही भातखळकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govinda Hospitalised : अभिनेता गोविंदाची प्रकृती अचानक बिघडली, तडकाफडकी रुग्णालयात दाखल

Maharashtra Live News Update: अभियांत्रिकीसह तीन अभ्यासक्रमांसाठी दोनदा 'सीईटी' परीक्षा होणार

Succcess Story: जिद्द! पहिल्याच प्रयत्नात सरकारी नोकरी, सोलापूरमधील शेतकऱ्याची लेक झाली क्लास वन अधिकारी, वाचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra Politics: शिवसेनेत जोरदार इनकमिंग; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदारानं हाती घेतलं धनुष्यबाण

Local Body Election : सांगली, अमरावती महापालिकेच्या आरक्षणाची सोडत जाहीर; कोणता वॉर्ड कुणाचा?

SCROLL FOR NEXT