ShivSena On BJP Saam Tv
मुंबई/पुणे

महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे षडयंत्र; शिवसेनेचा 'सामना'तून हल्लाबोल

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे, त्यामुळे आता महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारेप सुरू आहे, या बंडापाठिमागे भाजपचा हात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून शिवसेनेने भाजपवर आरोप केले आहेत. 'महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे काम सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बंडाळीमागे भाजपचा हात आहे, असंही या लेखात म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड केले आहे. सध्या शिंदे गट गुवाहाटीमध्ये आहे.

'शिवसेनेतील (ShivSena) बंडखोरीशी त्यांचा काहीही संबंध नाही, असे भाजपचे म्हणणे आहे. दुसरीकडे भाजपचे सरकार दोन दिवसांत येणार असल्याचे बोलले जात आहे. यात सत्य काय आहे? बंडखोर म्हणतात की आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी, हिंदुत्वासाठी भाजपसोबत जात आहोत. भाजपमुळे महाराष्ट्रावर हे संकट आले आहे. यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत, असंही या अग्रलेखात म्हटले आहे.

महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे प्रयत्न

'दिल्लीत बसलेल्या भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे धोकादायक षडयंत्र रचले आहे. महाराष्ट्राचे थेट तीन तुकडे करायचे आहेत, मुंबई वेगळी करायची आहे आणि छत्रपती शिवरायांच्या या अखंड महाराष्ट्राचा नाश करायचा आहे, महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करु, असे शिवसैनिक बोलले तर 'यांच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे, असा बोभाटा करायचा, असंही या लेखात म्हटले आहे.

ईडीचा (ED) दबाव आणून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. महाराष्ट्र सरकार पाडण्याचा उद्योग नक्की कोण करतंय, लोकांना 'ईडी'च्या जाळ्यात अडकवून त्यावर शिवसेना आणि सरकारच्या बाजूने उभे राहणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर हा खेळ किती दिवस चालणार, असंही या लेखात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ukshi waterfall : डोळ्यांचे पारणे फेडणारा उक्षी धबधबा, रत्नागिरीतील अनमोल सौंदर्य

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Aadhaar Update: आधार अपडेटचा नवीन नियम! आता घरबसल्या करा कौटुंबिक माहितीत बदल, प्रोसेस काय? वाचा सविस्तर

Railway Update : १२ तासानंतर हार्बर रेल्वेसेवा सुरळीत; मध्य आणि पश्चिम रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल

Kareena Kapoor : कोल्हापुरी चप्पल अन् समुद्रकिनारा; करीनाचा देसी स्वॅग, Pradaला टोमणा मारत म्हणाली...

SCROLL FOR NEXT