Maharashtra Kesari Sikandar Shaikh
Maharashtra Kesari Sikandar Shaikh Saam Tv
मुंबई/पुणे

Sikandar Shaikh News: वाद संपता संपेना! सिकंदरविरोधात ४ गुण देणाऱ्या पंचाला थेट पोलिसाकडून धमकी

साम टिव्ही ब्युरो

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्या कुस्तीवेळी पंच असलेले मारूती सावत यांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मुंबईतील एका पोलिस कर्मचाऱ्याने ही धमकी दिली आहे. याप्रकरणी सातव यांनी केसरी स्पर्धा अध्यक्षांकडे तक्रार अर्ज केली असून आता कोथरूड पोलिसांकडे करणार तक्रार आहेत. (Maharashtra Kesari)

संग्राम कांबळे असं धमकी देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे. पंच मारूती सावत यांनी केसरी स्पर्धा अध्यक्षांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलीस शिपाई संग्राम कांबळे यांनी त्यांना आज सकाळी फोन केला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दिलेल्या निर्णयावरून अभद्र भाषेत शिवीगाळ करत धमकी दिली.

इतकंच नाही, तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ वाहा की मी दिलेला निर्णय खोटा आहे असं फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने म्हटलं. या संपूर्ण प्रकाराची फोन रेकॉर्डिग देखील समोर आली आहे. दरम्यान, या धमकीनंतर पंच मारूती सातव याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समिती अध्यक्षांकडे तक्रार अर्ज केला. या तक्रारीचा अर्ज संपूर्ण प्रकरणी संदीप भोंडवे, महाराष्ट्र केसरी स्पर्धा समिती कडून कोथरूड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकार?

नुकताच पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेच्या सेमीफायनलचा सामना माती विभागातील सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात झाला. सामन्यांत वरचढ दिसणाऱ्या सिकंदर शेख याच्याविरोधात महेंद्र गायकवाडने दुसऱ्या फेरीत ४ गुण मिळवत ५-४ अशी आघाडी घेतली.

त्यामुळे सेमीफायनल सामन्यांत सिकंदर शेख याचा पराभव झाला. दरम्यान, महेंद्र गायकवाडने लावलेली बाहेरील डांग हा डाव ही व्यवस्थित झाला नव्हता. मग सिकंदर चार गुण कशाचे दिले गेले? असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले होते. याप्रकरणी सोशल मीडियावरून टीकेची झोड देखील उठली. आता थेट सामन्यांतील पंचांनी धमकी देण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Video: शिवाजी पार्कवर मोदींचं स्वागत होत असताना राज ठाकरेंची बॉडिलॅग्वेज कशी होती?

Nagpur Crime : जुन्या वादातून युवा कॅबचालकाचा खून, दाेघांवर गुन्हा दाखल

Pani Puri: घरच्या घरी बनवा टम्म फुगलेली पाणीपुरी, सोपी रेसीपी

Actor Chandrakanth Dies : जवळच्या मैत्रिणीचा कार अपघातात मृत्यू, नैराश्यात बुडालेल्या अभिनेत्याने संपवलं जीवन

Raj Thackeray यांचा हात धरला, त्यांना पुढे आणलं! Devendra Fadnavis यांची कृती चर्चेत, Video पाहिलात?

SCROLL FOR NEXT