12th student exam news  AI Image
मुंबई/पुणे

HSC Exam Timetable : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! अर्थशास्त्राच्या परीक्षेच्या वेळेत बदल; वाचा वेळापत्रक

HSC Exam 2026 Timetable Update News : महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेतील अर्थशास्त्र विषयाच्या पेपरच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. १७ फेब्रुवारी २०२७ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत परीक्षा होणार आहे. जाणून घ्या सुधारित वेळापत्रक.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्र बोर्डाने बारावीच्या अर्थशास्त्र विषयाच्या पेपरच्या वेळेत महत्त्वाचा बदल

  • अर्थशास्त्राची परीक्षा १७ फेब्रुवारी २०२७ रोजी होणार

  • सुधारित वेळेनुसार परीक्षा दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत घेतली जाणार

  • दहावी आणि बारावीच्या इतर विषयांच्या परीक्षा वेळापत्रकात कोणताही बदल नाही

सागर आव्हाड, पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल केला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेतील अर्थशास्त्र विषयाच्या पेपरची वेळ बदलण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुधारित वेळापत्रकाची माहिती घेऊनच परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

नवीन वेळापत्रकानुसार, बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची परीक्षा १७ फेब्रुवारी २०२७ रोजी दुपारच्या सत्रात घेतली जाणार आहे. हा पेपर दुपारी ३ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ६ वाजता संपेल. यापूर्वी हा पेपर सकाळच्या सत्रात घेण्याचे नियोजन होते. जुन्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत परीक्षा द्यावी लागणार होती. मात्र, आता या वेळेत बदल करण्यात आला आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी या बदलाबाबत माहिती दिली. मंडळाच्या पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण या नऊ विभागांमधून दहावी व बारावीच्या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत.

या दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाने ६ नोव्हेंबरपासून आपल्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या वेबसाइटवर जाऊन परीक्षेचे वेळापत्रक पाहता येणार आहे. दरम्यान, अर्थशास्त्राच्या पेपरच्या वेळेत केलेल्या बदलाशिवाय बारावी आणि दहावीच्या इतर विषयांच्या परीक्षांच्या तारखा व वेळांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतर विषयांच्या परीक्षांबाबत काळजी करण्याची गरज नाही.

मंडळाने विद्यार्थ्यांना आणखी एक महत्त्वाची सूचना दिली आहे. वेबसाइटवर दिलेले वेळापत्रक केवळ माहितीसाठी आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिले जाणारे छापील वेळापत्रक अंतिम मानले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा किंवा महाविद्यालयाकडून मिळालेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षेच्या तारखा आणि वेळ तपासावी. तसेच सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या अप्रमाणित वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Fancy No Plates: कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाय! फॅन्सी नंबर प्लेटसाठी मोजले 19 कोटी रुपये

Ramayana Collection : 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर पुन्हा धमाका! १५व्या दिवशी रचला नवा विक्रम, कमाई वाचून व्हाल थक्क

Maharashtra Fort : महाराष्ट्रातील अनोखा किल्ला! ज्याचा आकार आहे चक्क विंचवाच्या शेपटीसारखा, तुम्ही कधी पाहिलाय का?

Congress: काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल, ८१ नव्या सचिवांची नियुक्ती; महाराष्ट्राची जबाबदारी कुणाकडे?

SCROLL FOR NEXT