IAS Transfers List Saam tv
मुंबई/पुणे

IAS Transfers List : राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मालिका सुरुच; कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

IAS Transfers List News : राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मालिका सुरुच आहे. कुणाची कुठे नियुक्ती? वाचा एका क्लिकवर

Vishal Gangurde

३ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अजित कुंभार यांची महिन्याभरात दुसऱ्यांदा बदली

नंदकुमार बेडसे यांना महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे अध्यक्षपद

अनुष्का शर्मा यांना गडचिरोलीतील दुसऱ्यांदा मोठी जबाबदारी

एकीकडे राजकीय पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दुसरीकडे राज्य सरकारकडून बदल्यांचा धडाका सुरु आहे. काही दिवसांआधी राज्यात ३ आयएएस अधिकाऱ्यांचे बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात ३ बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.

राज्यातील ३ आयएएस अधिकाऱ्यांमध्ये अनुक्रमे अजित कुंभार, नंदकुमार बेडसे, अनुष्का शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे. अजित कुंभार यांची महिनाभरात दुसऱ्यांदा बदली झाली आहे. काही दिवसांपूर्वी तृप्ती धोडमिसे, विशाल नरवडे यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

आज कुणाची कुठे नियुक्ती?

अजित कुंभार (IAS:RR:2015) यांची नियुक्ती संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मुंबई येथे करण्यात आली आहे. तर नंदकुमार बेडसे (IAS:RR:2015) यांची नियुक्ती पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे.

गडचिरोलीच्या कुरखेडा उपविभागाचे सहायक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा (IAS:RR:2023)यांची नियुक्ती प्रकल्प अधिकारी, ITDP, भामरागड आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, अटापल्ली उपविभाग येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

अजित कुंभार यांची महिनाभरात दुसऱ्यांदा बदली?

काही दिवसांपूर्वीच अजित कुंभार यांची बदली झाली होती. त्यानंतर आज बुधवारी देखील अजित कुंभार यांची बदली झाली आहे. काही दिवसांपूर्वी अजित कुंभार (IAS:RR:2015) यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MAIDC) मुंबई येथे नियुक्ती आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी लग्न लपवलं, रहस्य उघडकीस आलं अन् प्रेयसीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, क्रूर कृत्याने संतापाची लाट

MPSC Recruitment: MPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ग्रुप-सीच्या २,६१९ पदांसाठी बंपर भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Monsoon Health Care: पावसाळ्यात वारंवार पोट बिघडतंय? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

Rain Alert: मुंबईसह ठाणे-रायगडमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस; पालघर- ठाण्यात उद्या शाळांना सुट्टी

Maharashtra News Live Update: ४ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी

SCROLL FOR NEXT