Pune School Saam Tv
मुंबई/पुणे

राज्यात तब्बल ४८७ अनधिकृत शाळा ; पालकांनी बोगस शाळा कशा ओळखायच्या? वाचा ५ महत्त्वाच्या गोष्टी

CBSE affiliation check online : महाराष्ट्रात तब्बल ४८७ अनधिकृत शाळा आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिक्षण विभागाने अनेक शाळांवर कारवाई केली.

Namdeo Kumbhar

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

list of unauthorized schools in Maharashtra : राज्यात तब्बल ४८७ शाळा अनाधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई विभागात सर्वाधिक संख्या असल्याचे समोर आले आहे. या शाळांपैकी केवळ ७६शाळांवर बंदीची कारवाई केली आहे,तर 111 शाळाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाचे ऍडमिशन घेण्यापूर्वी ज्या शाळा अनधिकृत आहेत, त्या तपासाव्यात. अनाधिकृत शाळेत आपल्या पाल्यांचे अॅडमिशन घेऊ नये यासाठी आवाहन केले जाते.

राज्यातील तब्बल ३१५ शाळांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्रत्यक्षात केवळ १६ प्रकरणात दंड वसूल झाला असल्याची माहिती शिक्षण आयुक्तांनी दिली आहे. पुणे विभागात ६३ अनधिकृत शाळा आढळलेल्या असून त्यापैकी ११ शाळा बंद केल्या आहेत ७शाळांविरोधात गुन्हा दाखल केला आहे १० शाळांकडून दंड वसुली केली आहे. राज्यात जवळपास ४७८ शाळा अनाधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. पण पालकांनी पाल्याचे अॅडमिशन घेण्याआधी शाळेंबाबत काही गोष्टी समजून घेणं गरजेचे आहे.

आपल्या मुलाचा प्रवेश घेण्यापूर्वी पालकांनी खालील गोष्टींची एकदा तपासाव्यातच...

  • शाळेकडे महाराष्ट्र शासनाचे मान्यता प्रमाणपत्र आणि 'ना-हरकत प्रमाणपत्र' (NOC) असल्याची खात्री करा.

  • जर शाळा CBSE किंवा ICSE बोर्डाची असल्याचे सांगत असेल, तर संबंधित बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन शाळेचा 'Affiliation Number' तपासा.

  • दरवर्षी शिक्षण विभाग किंवा जिल्हा परिषदेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली जाते. प्रवेश घेण्यापूर्वी ही यादी नक्की तपासा.

  • शाळेला स्वतःचे खेळण्याचे मैदान, अग्निशमन यंत्रणा आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा आहेत का, याची पाहणी करा.

  • शाळेचे कार्यालय आणि वर्ग एकाच सुरक्षित संकुलात असावेत. व्यावसायिक इमारतीमध्ये किंवा दाटीवाटीच्या ठिकाणी चालवल्या जाणाऱ्या शाळांबाबत सावध राहा.

शाळेकडे शासनाचे अधिकृत मान्यता प्रमाणपत्र आहे का, याची खातरजमा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बोगस शाळा ओळखा (प्रमुख लक्षणे):U-DISE क्रमांक: शाळेचा ११ अंकी U-DISE क्रमांक नसल्यास किंवा तो चुकीचा असल्यास शाळा बोगस असू शकते.

मान्यता: शासनाची मान्यता (Recognition) किंवा बोर्डाचे (CBSE/State) प्रमाणपत्र नसणे.

नाव: नाव खूप उच्चभ्रू किंवा इंग्रजी असले तरीही, आवश्यक कागदपत्रे नसल्यास ती बोगस शाळा असू शकते.

दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी एकूण ४५ शाळांना अनधिकृत घोषित केले आहे. यामध्ये ग्रामीण भागात २४ शाळा, पुणे महानगरपालिका भागात १२ शाळा आणि पिंपरी चिंचवडमधील १२ शाळांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SIR Update : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! SIR प्रक्रियेसाठी मुदतवाढ; नागरिकांना दिलासा

Maharashtra Politics : संजय शिरसाट अडचणीत, मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा, भाजपच्या नाराजीनंतर शिंदे मोठा निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT