Manoj Jarange Patil Saam TV News
मुंबई/पुणे

Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार नवीन जीआर काढण्याच्या तयारीत?

Maratha reservation 2025: मनोज जरांगे पाटील यांनी अन्नत्याग आंदोलनाची सुरूवात केली. आंदोलनाविरोधात दाखल याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार नवीन जीआर काढण्याची शक्यता.

Bhagyashree Kamble

  • मनोज जरांगे पाटील यांनी अन्नत्याग आंदोलनाची सुरूवात केली.

  • आंदोलनाविरोधात दाखल याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली.

  • मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार नवीन जीआर काढण्याची शक्यता.

  • कुणबी प्रमाणपत्र पडताळणीसाठी गाव पातळीवर नवीन स्क्रुटिनी कमिटी स्थापन होऊ शकते.

गणेश कवडे, साम टिव्ही

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अन्न-पाणी त्याग आंदोलनाला सुरूवात केली आहे. दरम्यान, या आंदोलनाविरोधात दाखल याचिकेवर मु्ंबई हाय कोर्टात युक्तीवाद सुरू असून, यावेळी कोर्टाने राज्य सरकारला काही सूचना दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठी हालचाल सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार नवीन (जीआर) काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कुणबी प्रमाणपत्रासाठी सुलभता, कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्रधारक यांच्या ऍफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून विचार केला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

गाव पातळीवर स्क्रुटिनी कमिटीची स्थापना, कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन स्क्रुटिनी कमिटी स्थापन करून, गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाधिवक्त्यांच्या मान्यतेनंतर जरांगे पाटील यांना मसुदा दाखवून अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

मुंबई हाय कोर्टात राज्य सरकारला सुचना

मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा आता थेट हायकोर्टापर्यंत पोहोचला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर युक्तीवाद सुरू आहे. यावेळी हायकोर्टाने काही महत्वाचे निरिक्षण नोंदवले आहेत. मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेलंय. आता कुणालाही मुंबईत येऊ देऊ नका, असे थेट निर्देश कोर्टाने राज्य सरकारला दिले आहे. यासह कोर्टाने राज्य सरकारला सुचना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत राजकीय खळबळ! अजित दादा सुपुत्र जय पवारांना उतरवणार रणांगणात? VIDEO

Cooker Cleaning : १० मिनिटांत कुकरचा काळपटपणा घालवा, वाचा घरगुती रामबाण उपाय

4th November Rashi Bhavishay: करिअर अन् पैशांत होणार मोठी वाढ, या 5 राशींचे नशीब आज चमकणार

नेपाळमध्ये मोठी दुर्घटना; बर्फाचा भलामोठा पर्वत कोसळला; ७ गिर्यारोहकांचा जागीच मृत्यू

Shukra Gochar 2025: धनदाता शुक्र पापी ग्रहाच्या घरात करणार प्रवेश; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT