Devendra Fadnavis Pune Shivajinagar News AI image
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे बसस्थानक; 825 कोटींचा पुनर्विकास प्रकल्प

Pune Shivajinagar Bus Depo : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा ८२५ कोटी रुपये खर्चून पुनर्विकास होणार आहे. एसटी, मेट्रो, रेल्वे आणि पीएमपीएमएल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा पुनर्विकास

  • प्रशस्त प्रतीक्षागृह, मोठे बस पार्किंग, स्वतंत्र कार्यशाळा आणि व्यावसायिक जागा उपलब्ध होणार

  • पुण्यासह खानदेश, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना फायदा

पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. तब्बल 825 कोटी रुपये खर्च करून या बसस्थानकाचा सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर पुनर्विकास करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शिवाजीनगर बसस्थानक महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि आधुनिक वाहतूक केंद्र ठरण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) आणि महामेट्रो यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बुधवारी झालेल्या बैठकीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

नव्या बसस्थानकात प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य दिले जाणार आहे. यामध्ये प्रशस्त प्रतीक्षागृह, बस उभ्या करण्यासाठी मोठी जागा, बस दुरुस्तीसाठी स्वतंत्र कार्यशाळा आणि व्यावसायिक वापरासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय प्रवाशांना आवश्यक असलेल्या इतर सुविधांचाही समावेश असेल. विशेष म्हणजे, या बसस्थानकातून वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक सेवांना जोडण्याची योजना आहे. एसटी बस, पुणे मेट्रो, रेल्वे, पीएमपीएमएल बस आणि रिक्षा या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. त्यामुळे प्रवाशांना एका वाहनातून दुसऱ्या वाहनात जाणे अधिक सोपे होणार आहे.

या प्रकल्पासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल. पुढील तीन ते चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नव्या वाहतूक केंद्रातून दररोज एक लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. पुण्यासह खानदेश, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, शिवाजीनगरचे भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून शिवाजीनगर बसस्थानक त्याच जागेवर विकसित करण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो, असे त्यांनी सांगितले. यासाठी परिवहन विभाग, एसटी महामंडळ आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update: ३ वर्षे PF खात्यात पैसे जमा नाहीत? तरीही मिळणार व्याज; EPFO चा मोठा नियम

Maharashtra News Live Update : आम्ही एनडीए सोबत आहोत आमचं डिलिमिटेशनला समर्थन - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Pandharpur : दुष्काळातही विठूरायावरील श्रद्धा कायम; कार्तिकी यात्रेत दानात १ कोटी २० लाखांची वाढ

Electricity Bill : घरात मीटरच नाही, तरीही आलं २,३६० रुपयांचं वीजबिल; महावितरणचा भोंगळ कारभार उघड

Government Land : सरकारी जमिनीवरील जुनी घरं अधिकृत होणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT