Maharashtra ganesh visarjan clash Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Ganesh Visarjan clash : निवडणुकीत 'मंगल', मिरवणुकीत दंगल? समाजकंटकांचा अराजक माजवण्याचा कट, पाहा व्हिडिओ

Maharashtra ganesh visarjan clash update : राज्यभरात गणेशोत्सव मिरवणूक शांततेत पार पडली असताना भिवंडीसह बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात शांततेला गालबोट लागलंय. विसर्जन मिरवणुकीत दगडफेक झाली. जळगाव जामोदमध्ये 18 तासांपासून थांबवलेल्या मिरवणुकींचं आज सकाळी शांततेत विसर्जन झालं. पाहूया एक रिपोर्ट...

Girish Nikam

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाच्या मागणीमुळे सध्या राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय. त्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांना राज्यात अनेक ठिकाणी गालबोट लागल्यामुळे राजकारण अधिकच तापलंय. गणपतीच्या मिरवणुकीदरम्यान भिवंडी, शेगाव, जळगाव-जामोद, अकोला जिल्ह्यात दगडफेक झाल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

भिवंडीत वंजारपट्टी नाका परिसरात मिरवणुकीत काही समाजकंटकांनी दगडफेक केली. त्यामुळे परीसरात संतापाची लाट पसरली होती. पोलिसांनी लाठीमार करून जमाव पांगवला. बुधवारी सकाळनंतर जनजीवन सुरळीत सुरू झालंय. ईद निमित्त मुस्लिम बांधवांची मिरवणूकही शांततेत पार पडली.

जळगाव-जामोद

बुलढाण्यातील जळगाव-जामोद येथे मंगळवारी विसर्जन मिरवणुकी दरम्यान दगडफेक झाली होती. जामोद येथील चौभारा, सायली वेस परिसरात मिरवणुकीवर दिवे बंद करून तुफान दगडफेक करण्यात आली. दोन्ही गटातील दीडशे ते दोनशे जणांचा जमाव समोरासमोर आला होता. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी प्लॅस्टिक बुलेटचे पाच राउंड फायर केले होते.

दगडफेकीनंतर जळगाव जामोदमध्ये मिरवणुका थांबल्या होत्या. पोलिस यंत्रणेनं मंडळ पदाधिका-यांशी चर्चा केली. त्यानंतर 15 गणेश मंडळांचं 20 तासांनंतर बुधवारी सकाळपासून शांततेत विसर्जन झालं.

शेगाव

शेगावमध्ये किरकोळ वादातून विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाली होती. त्यामुळे शिवाजी चौकात मिरवणूक थांबली होती. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली.

अकोला

अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातही विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाली. शहरातील नंदीपेठ भागात ही घटना घडली आहे. पोलिसांनी ३० ते ३५ जणांना ताब्यात घेतलंय.

'सरहदों पर बहुत तनाव है क्या, कुछ पता तो करो चुनाव है क्या'

राज्यातल्या मिरवणुकांमधल्या घटनांना चपखल बसल्याचं दिसतंय. कारण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. आणि त्यामुळेच राजकीय पोळी भाजण्यासाठी या घटना घडवल्या गेल्या का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT